JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रश्मी शुक्ला आणि फडणवीस भेटीवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले...

रश्मी शुक्ला आणि फडणवीस भेटीवर एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले...

‘तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल आहे. मात्र…’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 14 ऑक्टोबर : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली आहे. ‘ज्या दिवशी रश्मी शुक्ला यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली त्या दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचे स्पष्ट झालं होतं, त्यानुसार अपेक्षेप्रमाणे रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथील ठिय्या आंदोलन स्थगित केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असता रश्मी शुक्ला प्रकरणावरून भाजपवर टीका केली. ‘तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल आहे. मात्र फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आलं. हे कारण मला अद्यापही काळालेलं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.

( ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा..’; उदय सामंत यांचा थेट इशारा )

तसंच अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो. त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया, यासह इतर देशांमधून फोनवरून तुम्हाला मारून टाकू संपवून टाकू अशा धमक्या देण्यात आल्या होत्या, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती तसेच स्वतः पोलिसांनी संरक्षण सुद्धा दिलं होतं, असं खडसे यांनी यावेळी सांगितलं. याच प्रकरणाची आठवण करून देत खडसेंनी पोलिसांनी अचानक पोलीस संरक्षण काढून घेतलं होतं. असा मुद्दा स्पष्ट करत ज्यांनी 50 खोके घेतली आहेत. त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार आहेत, अशी विचारणाही खडसेंनी शिंदे सरकारकडे केली. (CM Eknath Shinde : ठाकरे गट झाला आता राष्ट्रवादी, जिल्हाप्रमुखच मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला, दिली मोठी जबाबदारी) सरकारच्या विरोधात जो आंदोलन करतो, त्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो, तसंच ना उमेद केलं जात अशीच भूमिका नेहमी सरकारची राहिली. एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जर रात्रभर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करून झोपावे लागत असेल तर जनसामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित करत पुढील काळात जिल्हा दूध संघ प्रकरणातील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या