भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.
लातूर, 4 एप्रिल: लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 12 जणांचे स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आले होते. त्यापैकी 8 जण कोवीड-19 पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. हेही वाचा.. मुंबईत कोरोनाने शनिवारी घेतला चौघांचा बळी, मृतांचा आकडा 22 वर दरम्यान, 12 मुस्लीम यात्रेकरू हरियाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे मागील तीन महिन्यापासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास होते. ते उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाले होते. 2 एप्रिलच्या मध्यरात्री निलंगा येथील मशिदीत थांबले होते. त्यांना क्वारंटाईन करून लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्य चार जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन याबाबत सविस्तर माहिती घेत आहे. हेही वाचा.. ‘शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासह कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करा’ या सर्व यात्रेकरूंवर तसेच विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आलेल्यांवर उपचार करताना पुरेशी काळजी घेण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत याची कुणालाही लागण होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आणि या सर्वांवर उपचार करून लॉकडाऊननंतर त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचे निर्देश पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. हेही वाचा.. मृत्यूशी झुंजत पोहोचली रुग्णालयाच्या दारात, ICU ला कुलूप असल्यानं गमावले प्राण हे सर्व यात्रेकरू निलंगा येथील ज्या मशिदीत आढळले होते. तेथे ते कोणाच्या संपर्कात आले. त्याचप्रमाणे त्यांच्या हरियाणा ते लातूरपर्यंतच्या प्रवासात कुठे आणि कुणाकुणाच्या संपर्कात आले याचा शोध घेण्याचे काम राज्य सरकारतर्फे सुरू आहे अशी माहितीही पालकमंत्र्यांनी दिली आहे.