JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हातात भगवं उपरणं, चेहऱ्यावर दरारा, ईडी अधिकाऱ्यांसोबत बंगल्याबाहेर येतानाचा राऊतांचा पहिला VIDEO

हातात भगवं उपरणं, चेहऱ्यावर दरारा, ईडी अधिकाऱ्यांसोबत बंगल्याबाहेर येतानाचा राऊतांचा पहिला VIDEO

शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जुलै : शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ताब्यात घेतलं आहे. ईडी अधिकारी संजय राऊतांना घेवून त्यांच्या भांडूप येथील बंगल्याहून ईडी कार्यालयाकडे निघाले आहेत. ईडी अधिकारी आज सकाळी साडेसात वाजेपासून संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. ईडी अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घराची झडती घेतली गेली. अखेर नऊ ते साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर आले. यावेळी त्यांनी गळ्यातील भगव्या रंगाचं उपर्ण हातात घेत चौफेर फिरवलं. त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. तसेच आपण घाबरलेलो नाही. काहीच होणार नाही, असं सांगणारे त्यांचे हालचाल होते. संजय राऊत यांची सलग नऊ तास चौकशी केल्यानंतर हालचालींना वेग आला. त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राऊतांच्या भांडूप आणि दादर या दोन्ही घरांच्या बाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबईतील बलार्ड पिअर भागातील ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. अतिशय जलद वेगाने घडामोडी घडत होत्या. त्यामुळे राऊतांना आता अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत बंगल्याबाहेर आले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. आपण घाबरलेलो नाही. तसेच मागे हटणार नाही, असं राऊत आपल्या वागणुकीतून दाखवून देत होते. राऊतांना घराबाहेर नेल्यानंतर त्यांनी गाडीतून हात उंचावरुन सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.

( सर्वात मोठी बातमी, सलग 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात ) शिवसैनिक प्रचंड आक्रमक दरम्यान, ईडी कारवाईमुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी जमा झाली. मैत्री बंगल्याच्या दोन्ही गेटबाहेर शिवसैनिकांची आज सकाळपासून गर्दी जमलेली आहे. आम्ही राऊतांना घेवून जावू देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी सुरु आहे. शिवसैनिकांचा आक्रमकपणा पाहता पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा मैत्री बंगल्याबाहेर तैनात करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या