पालघर, 5 सप्टेंबर: वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर जिल्ह्यातील नागरिकांचं भय अद्याप संपलेलं दिसत नाही. शुक्रवारी रात्री 10 वाजून 33 मिनिटांनी 2.8, 11 वाजून 41 मिनिटांनी 4.0 तर 12 वाजून 05 मिनिटांनी 3.6 असे रिश्टर स्केलचे धक्क्यांनी पालघर जिल्हा पुन्हा एकदा थरथरला. जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरात भूकंपाचे जवळपास सात ते आठ धक्के बसले. 2018 पासून वारंवार भूकंपाचे शेकडो धक्के बसले आहेत. वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिक भयभीत झाले आहेत. हेही वाचा… पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट! अनेक आमदार गैरहजर राहणार डहाणू शहराच्या पूर्वेच्या भगत मध्यरात्रीच्या सुमरास भूकंपाचे दोन मध्यम झटके बसले. या भूकंपामुळे डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात अनेक भागांना कंप जाणवला. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री 11 वाजून 42 मिनिटांला 4.0 तीव्रतेचा तर मध्यरात्री 12 वाजून 05 मिनिटाला 3.6 तीव्रतेचा धक्का बसला. अनेक नागरिक झोपेत असताना या धक्क्यामुळे घरातील भांडी, वस्तु पडल्यानं नागरिक खडबडून जागे झाले. नोव्हेंबर 2018 पासून या भागात भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला धक्के बसत नव्हते. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून हे सत्र पुन्हा सुरू झाल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. या बाबत भूगर्भीय अभ्यास होत असून शासनाने या भागातील शासकीय कार्यालय, इमारती, आश्रमशाळा तसेच घरांच्या मजबुतीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या योजना अजूनही कागदावरच असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी परसरली आहे. या धक्क्यानंतर अनेक नागरिकांनी घराबाहेर बऱ्याच काळ थांबणे पसंत करत आहेतय या भूकंपमुळे नुकसान झाल्याची माहिती अजूनही पुढे आली नाही.
24 तासांत दोन वेळा भूकंप… मुंबईत तर 24 तासांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी 6.36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात येणाऱ्या भूकंपानंतर आता मुंबईतही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दुसरीकडे भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं आहे. हेही वाचा.. कोरोनाचा कहर थांबेना! गणपतीत एकत्र आलेल्या एका परिवारातील 30 जण पॉझिटिव्ह नाशिकलाही बसले धक्के… नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. 4 रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती . शुक्रवारी मध्यरात्री 11.41 च्या सुमारास भूकंप झाला. यात कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अजून समोर आली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाची माहिती दिली.