JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ट्रक भरधाव वेगात असताना चालकाला हार्ट अ‍टॅक; पुढे घडली भयानक घटना

ट्रक भरधाव वेगात असताना चालकाला हार्ट अ‍टॅक; पुढे घडली भयानक घटना

अविनाश पाल (वय 24, रा. सुल्तानपूर, उत्तरप्रदेश) असे ट्रक चालकाचे नाव आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवी शिंदे, प्रतिनिधी ठाणे, 21 ऑक्टोबर : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील मुंबई- नाशिक महामार्गावरील हायवे - दिवे याठिकाणी ही घटना घडली. इथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या ट्रक चालकाला स्टेअरिंग वर असतानाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अविनाश पाल (वय 24, रा. सुल्तानपूर, उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तो हायवे-दिवे गावाच्या हद्दीत ट्रक चालवीत असतानाच ट्रक चालकास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो ट्रकच्या कॅबिनच्या दरवाजावर कोलमडला. हेही वाचा -  डॉक्टर पत्नीचं भयंकर कृत्य; बिझनेसमन पतीला मांत्रिकाला भेटवलं, कोट्यावधींची फसवणूक ट्रक रस्त्यातच थांबल्याने वाहतूक कोंडी झाल्याने वाहतुक पोलीस यांनी तत्काळ ट्रक चालकास बाहेर काढून रिक्षाने मानकोली येथे एक खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेवुन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले आहे.

प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा ज्यूस चढवल्याने Dengue रुग्णाचा मृत्यू -  सध्या अनेक ठिकाणी डेंग्यूचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. निदान लवकर झाल्यास व वेळीच उपचार मिळाल्यास त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. डेंग्यूच्या आजारात येणाऱ्या तापामुळे शरीरातलं प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होत जातं. अशा वेळी रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स द्यावे लागतात. प्रयागराजमध्ये डेंग्यूच्या एका रुग्णाच्या शरीरात प्लेटलेट्स कमी झाल्यानं त्याला बाहेरून ते देण्याची गरज होती; पण खासगी रुग्णालयात त्याला प्लेटलेट्सऐवजी चक्क मोसंबी ज्यूस देण्यात आला व प्रकृती अत्यवस्थ होऊन त्या रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर आरोग्य विभागानं तत्काळ कारवाई करून हॉस्पिटलचा परवानाच रद्द केला. हॉस्पिटल सील करण्याचे आदेश सीएमओ म्हणजेच मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या