मुंबई, 9 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही आज (9 सप्टेंबर) मुंबईत येत आहे. मुंबई एअरपोर्टवर शिवसेनेची निदर्शने सुरू आहेत. विशेष म्हणजे एअरपोर्टमधील ग्राऊंड स्टाफचाही शिवसेनेच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र, कंगनाविरोधा विमानतळावर कोणतंही आंदोलन करु नका, असे आदेश शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. मुंबई विमानतळावर आंदोलन झाल्यास त्याची सहानुभुती कंगनाला मिळेल, अशी भावना शिवसेना नेतृत्त्वाची आहे. कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई हीच शिवसेनेची व्यूहरचना असल्याचं या आदेशात म्हटलं आहे. हेही वाचा… मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणारे ATSच्या ताब्यात त्याचबरोबर कंगनाच्या विषयावर बोलू नका. मुंबई महापालिकेनं कंगनाचे पाली हिल, वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई केली आहे. या कारवाईबाबत पक्षनेते आणि प्रवक्तांनी काहीही वक्तव्य करू नये, असे मातोश्रीवरून सक्त आदेश आहेत. दुसरीकडे, मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. कंगना रणौत हिच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत अस0लेले बांधकाम पाडण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधी कंगनाच्या ऑफिसबाहेर नोटीस बजावली होती. कंगनाने हे ऑफिस मनिकर्निका सिनेमाच्या आधी उभारले होते. पण, यात बरेच बांधकाम हे अधिकृत असल्याचे समोर आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर कंगनाने कमालीचा संताप व्यक्त केला आहे. ‘मी जे बोलले होते, ते अगदी बरोबर आहे. मुंबई ही पाकव्याप्त भाग आहे, हे पालिकेच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया कंगना हिनं दिली आहे. दरम्यान, कंगनाच्या अनधिकृत कार्यालयाच्या पाडकामाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (गुरूवारी) सुनावणी होणार आहे. शिवसेनेची केली बाबरच्या सैन्याशी तुलना अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत वाद आता विकोपाला पोहोचला आहे. मुंबई पालिकेनं कंगनाच्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकाम तोडलं आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे कंगना कमालीची भडकली आहे. कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. कंगनाने शिवसेनेची तुलना थेट बाबरशी केली आहे. कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचे म्हटले आहे. हेही वाचा… ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात मुघलाई अवतरल्याचं चित्र’ कंगना एवढ्यावरच थांबली नाही. आपण मुंबईला पाकव्याप्त भाग म्हटलो होतो. आता हे काही चुकीचे नाही. कारण पालिका तशी कारवाईच करत आहे, असंही कंगनाने पुन्हा एकदा म्हटलं आहे.