JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dr. Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त याठिकाणी 1 रुपयात मिळणार 1 लिटर पेट्रोल

Dr. Ambedkar Jayanti: बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त याठिकाणी 1 रुपयात मिळणार 1 लिटर पेट्रोल

सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या इंधनाच्या दरांमध्ये जवळपास दररोज वाढ होत आहे. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर 14 एप्रिल : सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar Jayanti) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास पूजा व बुद्धवंदना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि विश्वस्त समितीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांकडून  बुद्ध वंदना देण्यात आली. सोलापुरातील मध्यवर्ती भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना देण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसागर लोटला होता. दरम्यान बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आज सोलापुरात 1 रुपयात एक लिटर पेट्रोल दिलं जाणार आहे (One Liter Petrol in 1 Rupees). नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार, चालत्या कारने अचानक पेट घेतला, घटनेचा Live VIDEO मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या इंधनाच्या दरांमध्ये जवळपास दररोज वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापुरातील डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल उपलब्ध करण्यात येणार आहे. ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याच्या षडयंत्रातील ‘त्या’ व्यक्तीला बेड्या, नागपूरच्या व्यक्तीचं गूढ अखेर उकललं? सोलापुरातील मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने 14 एप्रिल ते 17 एप्रिल असा जयंती उत्सव सप्ताह जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापुरातील विविध ठिकाणी दिवसभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध वंदना देण्यासाठी आंबेडकर चळवळीतील प्रमुख नेते रात्रीच्या सुमारास उपस्थित होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या