Home /News /nagpur /

'सिल्व्हर ओक'वरील हल्ल्याच्या षडयंत्रातील 'त्या' व्यक्तीला बेड्या, नागपूरच्या व्यक्तीचं गूढ अखेर उकललं?

'सिल्व्हर ओक'वरील हल्ल्याच्या षडयंत्रातील 'त्या' व्यक्तीला बेड्या, नागपूरच्या व्यक्तीचं गूढ अखेर उकललं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी करण्यात आलेल्या हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी नागपुरातील एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

    मुंबई, 13 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी करण्यात आलेल्या हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नागपुरातील एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणाला नागपूर कनेक्शन (Nagpur Connection) असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच कनेक्शनमधील ही व्यक्ती आहे का? याबाबतचा खुलासा अद्याप तरी अधिकृतपणे करण्यात आलेला नाही. पण नागपुरातून एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्याची बातमी समोर आली आहे. सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात नागपूरच्या एका व्यक्तीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. सरकारी वकील प्रदिप घरत यांनी कोर्टात वारंवार नागपूरच्या एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. पण त्या व्यक्तीचं नाव सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं नव्हतं. आता नागपुरातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तीच व्यक्ती तर ही नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. नागपुरातून नेमकं कुणाला अटक? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सिल्व्हर ओक' हल्ला प्रकरणी नागपूरमधील संदीप गोडबोले या एसटी कर्मचाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संदीप गोडबोले हा एसटीमध्ये यांत्रिकी पदावर कार्यरत होता. त्याला आंदोलन काळामध्ये निलंबित करण्यात आले होते. मात्र सिल्वर ओक प्रकरणामध्ये संदीप गोडबोले याची नेमकी काय भूमिका होती त्याबद्दल आम्हाला माहीत नसल्याचे नागपूरच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारी वकिलांनी नागपूरच्या व्यक्तीचा नेमका काय उल्लेख केला? "गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या टॅरेसवर 7 एप्रिल 2022 ला रात्री 11 ते अडीच वाजेपर्यंत मिटींग झाली होती. यावेळी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील, अभिषेक पाटील आणि नागपूरची एक व्यक्ती होती. या प्रकरणी सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरु असताना सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार आहेत. जयश्री पाटील यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे", असं सरकारी वकील प्रदिप घरत म्हणाले. "नागपूरची व्यक्ती मुंबईत होती. आंदोलनाच्या ठिकाणी होती, ज्या दिवशी आंदोलन झाले ते सर्व आंदोलन नागपूरची व्यक्ती हॅन्डल करत होती. नागपूरच्या व्यक्तीने अभिषेक पाटील याला फोन केला आणि सिल्व्हर ओक जवळील गार्डनमध्ये लोकांना यायला सांगितले. नागपूरच्या व्यक्तीला अभिषेक पाटीलने नंतर फोन केला अणि लोकं गार्डनमध्ये जमा झाल्याचे सांगितले. त्यानंतर नागपूरच्या व्यक्तीने मेसेज केला की, पत्रकारांना पाठवा. अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी हे हल्ल्याआधी त्या नागपूरच्या व्यक्तीला समोरा समोर भेटले", असं वकिलांनी कोर्टात सांगितलं दोन आरोपींचं संभाषण उघड दरम्यान, या प्रकरणातील मोठा खुलासा करणारं संभाषण 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागलं आहे. सदावर्तेंच्या रिमांड कॉपीमध्ये सिल्व्हर ओक हल्ल्याआधी कशी अरेंजमेंट केली गेली त्याच्या फोन संभाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे. 'सिल्व्हर ओक'वर हल्ल्याचा कट कसा रचला गेला? 'सिल्व्हर ओक'वर कसा हल्ला केला गेला? आणि काय घडलं 'सिल्व्हर ओक' हल्ल्या आधी? आंदोलनकर्त्यांची कशी जमावजमव केली गेली? याबाबत मोठा खुलासा करणारं संभाषण 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागलं आहे. हल्ल्याच्या काही मिनिटाआधीच अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि एक एसटी कर्मचारी संदिप गोडबोले यांचे फोनवर संभाषण होतं. त्यांच्या संभाषणातून हल्ल्याबाबतची ओझरती माहिती समोर येत आहे. अभिषेक पाटील : हॅल्लो ! संदीप गोडबोले : बोल अभिषेक अभिषेक पाटील - तिथेच जाऊ का? संदीप गोडबोले - हा तिथेच जायचे अभिषेक पाटील - आम्ही बंगल्याच्या तिथे चपला सोडल्या. आम्ही लवकर आलो. आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लोक लय आले. काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब. करावं तर सगळं आपणच करावं. बाकीचे निवांत बसावे. इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं. मुदलियार पाटील आताच आले. आता रात्रभर मैदान आहे. सकाळी 9 पर्यंत अंघोळ करून पण येऊ नये का. संदीप गोडबोले - आता कुठे आहेत तुम्ही? अभिषेक पाटील - इथे सगळ्या महिला घेतल्यात डायरेकट. त्यांना तिकीटना पैसे दिलेत. तिकीट काढलेत निघालेत. ७० ते ८० महिला आणि माणसं १०० -२०० संदीप गोडबोले - महालक्ष्मी पेट्रोल पम्प कुठे आहे विचारा अभिषेक पाटील - बरं पेट्रोल पम्पावर ना? मीडिया आली संदीप गोडबोले - मीडिया आली आहे अभिषेक पाटील - चला मिडीआ आली भाऊ संदीप गोडबोले - हो

    तुमच्या शहरातून (नागपूर)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या