अपंग शेतकरी महिला वनिता संतोष इंगळे ही महिला शेतात सांडलेले सोयाबिन (सरवा )वेचण्याकरीता गेली होती. त्यावेळी
अमरावती, 12 नोव्हेंबर : अस्मानी संकटाने आधीच बळीराजा हवालदील झाला आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील आष्टी इथं दारुच्या नशेत एका विकृत निवृत्त पोलीस कर्मचारी विजय दहातोंडे याने एका अपंग शेतकरी महिलेला पट्याने व काठीने जीवघेणी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. भातकुली तालुक्यातील आष्टी येथील शेत शिवारात ही घटना घडली. अपंग शेतकरी महिला वनिता संतोष इंगळे ही महिला शेतात सांडलेले सोयाबिन (सरवा )वेचण्याकरीता गेली होती. त्यावेळी वलगाव पोलीस स्टेशन येथील निवृत्त पोलीस कर्मचारी विजय दहातोंडे याने दारुच्या नशेत अपंग शेतकरी महिलेला पट्याने व काठीने जबर मारहाण केली. ही घटना 3 दिवसांपूर्वीची सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. पण पोलीस तक्रार केल्यास संपुर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर धाडस करून या महिलेनं तक्रार दिली आणि प्रकरणाचा वाचा फुटली. (शेजाऱ्याचा कुत्रा भुंकल्याने भडकला माजी कृषी अधिकारी, रागात गोळीबार केला अन्…, बीडमधील धक्कादायक घटना) महिलेच्या अंगावरील मारहाणीचे निशाण पाहून आरोपीच्या कृरतेची कल्पना येते. आरोपी विरुद्ध अपंग शेतकरी महीलेने वलगाव पोलिसांना तक्रार दाखल केली आहे. मात्र आरोपी निवृत्त पोलीस कर्मचारी असल्याने आरोपींला पोलिस कुठेतरी वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. आरोपी विरुद्ध 324, 504, 506 नुसार वलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यात अजूनही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला नाही. आरोपीला अटक सुद्धा केली नाही. आरोपीविरुद्ध वलगाव पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप अपंग शेतकरी महिलेने केला आहे. (प्रेमप्रकरणातून भिवंडीतल्या युवकाची घृणास्पद हत्या, कारण ऐकून व्हाल हैराण) अमरावती जिल्ह्यात पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, खासदार आमदार या सर्व पदावर महिला आहेत, असे असताना सुद्धा जिल्ह्यात महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने सुरूच आहे. या घटनेचा गावकऱ्यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे.