JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री आपलाच असणार, धनंजय मुंडेंच्या विधानाने चर्चांना उधाण

येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री आपलाच असणार, धनंजय मुंडेंच्या विधानाने चर्चांना उधाण

साताऱ्यातील शेतकरी मेळाव्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठं विधान केलं आहे.

जाहिरात

'पुढचा मुख्यमंत्री आपलाच असणार', धनंजय मुंडेंच्या विधानाने चर्चांना उधाण

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 4 जून : येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री (Maharashtra CM) हा आपलाच असेल असे विधान धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील शेतकरी मेळावाच्या सभेत हे विधान केले आहे. धनंजय मुंडे हे शुक्रवारी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदार संघात आले आहे होते. यावेळी विविध विकास कामांच्या उदघाटनाबरोबर त्यांची खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे झालेला शेतकरी मेळावा (Shetkari Melava) हा चांगलाच गाजला. धनंजय मुंडे यांनी या मेळाव्यात महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी त्यांनी पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रिपदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. वाचा :  ईडी कारवाईची टांगती तलवार, बविआ भाजपा मतदान करणार? मविआची डोकेदुखी वाढणार धनंजय मुंडे म्हणाले, पवार साहेबांनी माझ्यावर विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्षे विरोधी पक्षनेता होतो आणि ती जबाबदारी पार पाडली. आज शब्द देतो… सामाजिक न्याय आणि विशेष विभागाचा मंत्री म्हणून … येणाऱ्या काळात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रिपद द्यायचं कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील…. ते आपलेच असतील. ते म्हणतील हे विभाग आपल्या शिवाय दुसऱ्या कुणालाच नको. पाच दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्रिपदावर केलं होतं भाष्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडं देवीला घातलं आहे. तसंच, मी मुख्यमंत्री व्हावं असा विचार कधी केला नाही,याचा निर्णय राज्याची जनताच घेईल, अशी प्रतिक्रियाही सुळे यांनी दिली होती. सुप्रिया सुळे यांच्याकडून देवीला साकडं घालण्यात आले. ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं सुप्रिया सुळे यांनी घातलं. ‘खरंतर आपल्याला काय मिळाले, याबद्दल देवळात आभार मानण्यासाठी येत असते. मंदिरात आल्यानंतर इथं जमलेले कार्यकर्ते आणि पुजारी यांनी काही तरी मागणी करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे, देशातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्याला दिलासा मिळू दे, असं साकडं घातलं, असं सुळे यांनी सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या