JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अपघातानंतर धनंजय मुंडेंची प्रकृती आता कशी? अजित पवारांनी दिली मोठी अपडेट

अपघातानंतर धनंजय मुंडेंची प्रकृती आता कशी? अजित पवारांनी दिली मोठी अपडेट

धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार हे सकाळ-संध्याकाळ डॉक्टरांसोबत बोलत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 5 जानेवारी : धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे. धनंजय मुंडेंची सातवी आणि आठवी बरगडी फ्रॅक्चर झाली आहे, त्यांना पाच-सहा दिवस रुग्णालयात विश्रांती करावी लागणार आहे, असं अजित पवार म्हणाले. मुंबईतल्या ब्रिच कँडी रुग्णालयात धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्याबाबत मी सकाळ-संध्याकाळ डॉक्टरांसोबत चर्चा करत आहे, त्यांना विश्रांतीची गरज असून त्यांना भेटायला जाण्यासाठी कुणीही गर्दी करू नये. धनंजय मुंडे यांना पाच-सहा दिवस रुग्णालयात विश्रांती करावी लागणार आहे, मी डॉक्टरांना सांगितलं आहे, त्यांना जेवढे दिवस रुग्णालयात ठेवायचं आहे तेवढे दिवस ठेवा, पण कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं अजित पवार यांनी सांगितलं. मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत असताना राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा 4 जानेवारीला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला दुखापत झाली.

संबंधित बातम्या

अपघातानंतर धनंजय मुंडे यांना परळीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, यानंतर काल त्यांना मुंबईत एअरलिफ्ट करण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या