मुंबई, 23 नोव्हेंबर : मागच्या चार दिवसांपासून श्रद्धा वालकर खून प्रकरणात प्रत्येक तासाला नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेत मिळालेल्या नवीन माहितीनुसार श्रद्धाने 2020 मध्ये महाराष्ट्राच्या पालघरमधील तुळींज पोलीस ठाण्यात एक पत्र लिहिले होते, पत्राद्वारे श्रद्धाने तक्रार केली होती आरोपी आफताब पूनावाला याने मारहाण केली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तीने पत्र दिले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केले आहे.
फडणवीस म्हणाले की, ते पत्र माझ्याकडे आले आहे. ते पत्र पाहिल्यांनंतर मला यातील गांभीर्य समजले आहे. ते फार गंभीर पत्र आहे. त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, याचा तपास आपल्याला करावा लागणार आहे. मी कुणावरही आरोप करणार नाही. पण या प्रकारच्या पत्रांवर कारवाई नाही झाली, तर अशा घटना घडतात. त्यामुळे या पत्राचा नक्कीच तपास केला जाईल. जर त्या पत्रावर कारवाई झाली असती, तर कदाचित श्रद्धाचा जीव वाचला असता, असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : ‘लव्ह जिहाद’चा संशय, विश्व हिंदू परिषदेकडून मुस्लिम तरुणांना कॉलेजमध्ये घुसून मारहाण
श्रद्धाने लिहलेल्या पत्रात आहे तरी काय?
श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार पत्र लिहिले होते. महाराष्ट्र पोलिसांनी देखील श्रद्धाच्या शेजाऱ्याने शेअर केलेल्या या पत्राला दुजोरा देत ही घटना खरी असल्याचे सांगितलं आहे.
आफताबने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांकडे जाण्याची हिंमत तिच्यात नव्हती, असे श्रद्धाने तक्रार पत्रात म्हटले आहे. मात्र, आफताबने पत्र लिहलेल्या दिवशी तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि तिला जीवे मारण्याची आणि तिचे तुकडे करून फेकून देण्याची धमकीही दिल्याचे तिने सांगितले त्या पत्रात नमुद केले आहे.
पत्रात दिलेल्या माहितीनुसार आफताब श्रद्धाला सहा महिने मारत होता. दरम्यान याबाबत आफताबच्या कुटुंबियांना श्रद्धाला मारहाण होत असल्याचे माहिती होते. असेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
हे ही वाचा : आफताब हत्या करून तुकडे करणार हे श्रद्धाला आधीच माहिती होतं? 2 वर्षांपूर्वीचं ते पत्र समोर
मी आजपर्यंत त्याच्यासोबत राहिलो कारण आमचं लग्न होणार होतं आणि त्याच्या घरच्यांचा आमच्या एकत्र राहण्याला पाठींबा होता. यापुढे मी त्याच्यासोबत राहायला तयार नाही. त्यामुळे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे शारीरिक नुकसान झाल्यास दखल घ्यावी असेही त्या पत्रात लिहण्यात आले आहे. मी त्याला कुठेही दिसत असे त्यावेळी तो मला ठार मारण्यासाठी किंवा मला त्रास करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता, असे पत्रात लिहिले आहे.