मुंबई, 25 एप्रिल: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला भाजपच्या नेत्यांनी बहिष्कार (BJP leaders boycotted) टाकला. भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक संपल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला. फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांवरील (Kirit Somaiya) हल्ला, राणा दाम्पत्य यावर ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आम्हाला बैठकीचं निमंत्रण दिलं होतं, पण हिलटरलशाहीमुळे आम्ही या बैठकीवर बहिष्कार घातला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सरकारने संवादासाठी जागा ठेवली नाही एवढ्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री नाहीत मग ही बैठक टाईमपास आहे का? अशा गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा काय? असंही फडणवीस म्हणाले आहेत. ‘‘हे दोन चार दिल्लीत जातात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात’’ सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले करत असतील आणि त्यानंतरही एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर अशा बैठकींना जाऊन फायदा काय? असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. ‘‘आम्ही भ्रष्टाचारावर बोलायचं थांबणार नाही’’ आम्ही पोलखोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील सगळा भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर मांडला. पण महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती आम्ही कधीच पाहिली नाही. लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? त्यांनी आमच्या पोलखोल यात्रेवर आणि रथावर हल्ला केला. सत्ताधाऱ्यांना असं वाटत आहे की असे हल्ले करून आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलायचं थांबू, मात्र आम्ही थांबणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला आव्हानं दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे