JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय कधी?, शरद पवारांनी दिलं उत्तर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय कधी?, शरद पवारांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या आघाडीवर भाष्य केलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 15 मे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतल्या आघाडीवर भाष्य केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आघाडी येत्या 15 दिवसांत निर्णय घेईल, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. केतकीच्या या टीकेबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला संबंधित प्रकरणाची माहिती नसल्याचं बोलत या विषयावर फारसं भाष्य करणं टाळलं. माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव आणि सहकारसूर्य या गोदावरी अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय उद‌्घाटननिमित्त पवार नांदेड (Nanded) येथे आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र किंवा स्वतंत्र लढण्याविषयी सहकारी पक्षांसोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील. 15 दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. केतकी चितळेच्या टीकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया “कोण केतकी? नेमकं काय प्रकरण आहे हे मला ठाऊक नाही. संबंधित व्यक्तीही मला माहिती नाही. तुम्ही सांगता तेही माहिती नाही. त्यांनी काय केलं. तक्रार काय होती. नेमकं काय केलं ते कळाल्याशिवाय बोलता येत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. “दोन-तीन दिवस माझ्याबद्दलची एक तक्रार वाचण्यात आली. एका कवीच्या काव्याचा मी भाषणात उल्लेख केला होता. त्यावर काही लोकांनी वेगळं मत मांडलं पण ते वास्तव नव्हतं”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले. केतकी चितळेला अटक शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणं अभिनेत्री केतकी चितळेला प्रचंड महागात पडलं आहे. कारण शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याने तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला नवी मुंबई येथून पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे हिला कलंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या