मुंबई, 26 जुलै : कोकण (konkan flood), कोल्हापूर (kolhapur flood), सांगली, सातारा आणि रायगडमध्ये (raigad konkan landslide) अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. पूरग्रस्त भागात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 जण अजूनही बेपत्ता आहेत. तर या अस्मानी संकटाच्या प्रकोपात तब्बल 25 हजार 564 जनावरं दगावली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने आज 26 जुलै रात्री 11 वाजेपर्यंतची माहिती प्रसिद्ध केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतून सुमारे 2 लाख 29 हजार 74 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं आहे. आतापर्यंत एकूण 164 जणांचे मृत्यू झाले आहेत. तसंच 56 जण जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या दुर्घटनांमध्ये बेपत्ता असलेल्या 100 जणांचा NRDF च्या जवानांकडून तपास केला जात आहेत. अनेकांचे मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हेही वाचा- VIDEO : NDRF ची मदत नाही, मंगेशच्या देशी जुगाडामुळे 5 महिलांचा वाचला जीव सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि कोकणातील काही अन्य भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण 1028 गावं बाधित झाली आहेत. पुरामुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाकडून 259 निवारे उभारण्यात आले आहेत. या निवारा केंद्रात सध्या 7832 लोकं निवारा घेतं आहेत. पण संबंधित लोकांच्या शेतीचं, घराचं आणि व्यवसायाचं प्रचंड नुकसान झालं आहे. आता अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत गरजू लोकांनी मदतीचा हात देत आहेत. हेही वाचा- कोकणवासियांवरचं संकट कायमचं टळणार; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय मागील दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पूरग्रस्त ठिकाणाची पाहणी करत आहेत. लवकरच मोठी मदत जाहीर करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं आहे.