JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सिक्स मारून क्रिकेटचा सामना जिंकला पण आयुष्याचा सामना हरला, भिवंडीत खेळाडूच्या मृत्यूमुळे हळहळ

सिक्स मारून क्रिकेटचा सामना जिंकला पण आयुष्याचा सामना हरला, भिवंडीत खेळाडूच्या मृत्यूमुळे हळहळ

शेवटच्या षटकात 2 चेंडू वर 4 धावांची गरज होती. त्यावेळी खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या संजय ठाकरे यांनी उत्तुंग षटकार ठोकला.

जाहिरात

शेवटच्या षटकात 2 चेंडू वर 4 धावांची गरज होती. त्यावेळी खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या संजय ठाकरे यांनी उत्तुंग षटकार ठोकला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भिवंडी, 20 जून : 2 चेंडूत 4 धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या खेळाडूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच षटकार मारणाऱ्या क्रिकेटपट्टूवर (Cricket ) काळाने झडप घातली. सामना जिंकल्यानंतर घरी जात असताना 45 वर्षीय व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे घडली. संजय ठाकरे (वय 45 रा.अंबाडी) यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गोविंद ठाकरे हे उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. रविवारी 45 वर्षां वरील खेळाडूंसाठी 45 प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील घोटगाव येथे केले होते. त्या ठिकाणी टुर्नामेंटमध्ये संजय ठाकरे हे गुड मॉर्निंग संघातर्फे खेळण्यासाठी गेले होते. ते खेळत असणाऱ्या गुड मॉर्निंग या संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात शेवटच्या 2 चेंडू वर 4 धावांची गरज होती. त्यावेळी खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या संजय ठाकरे यांनी उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ( Ranbir Kapoor ने फॅन्सना सरप्राईज देत केलं इमोशनल, काय केलं पाहा! ) विजयाचा आनंद साजरा करीत घरी निघालेल्या संजय ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ अंबाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांचे सहकारी खेळाडू घेऊन गेले.  दुर्दैव मात्र रुग्णालयात दाखल करण्या आधीच त्यांना मृत्यूने गाठले त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ( कुणी व्हील चेयरवर, कुणी वॉकरवर, तर PPE किटमध्ये; प्रतिष्ठेच्या लढतीत MLAचीं परेड ) भिवंडी तालुक्यातील अंबाडी या महत्वपूर्ण ग्रामपंचायतचे ते अनेक वर्षे सदस्य म्हणून कार्यरत होते. तर उत्कृष्ट क्रिकेटपटू असणारे संजय ठाकरे हे सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून परिसरावर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या