JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गावी जाण्यासाठी ई पास हवाय का? पोलिसांनी सांगितलेल्या अटी वाचा

गावी जाण्यासाठी ई पास हवाय का? पोलिसांनी सांगितलेल्या अटी वाचा

महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवासासाठी ई पास कसा मिळवावा यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी गाईडलाईन प्रसिद्ध केल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मे : कोरोनाच्या (covid 19) पार्श्वभूमीवर देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन (Lockdown) कऱण्यात आलं. पहिल्या दोन लॉकडाऊनमध्ये असलेले निर्बंध तिसऱ्या लॉक़डाऊनमध्ये कमी करण्यात आले. यामुळे अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाता येत आहे. या काळात अनेक लोक चालत घरी गेले. यात काहींना प्राणही गमवावे लागले. नागरिकांच्या अडचणी आणि त्यांच्या जीवाला असलेला धोका ओळखून महाराष्ट्र सरकारने अशा नागरिकांसाठी सोय केली आहे. विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. तसंच बाहेरच्या राज्यातील नागरिकांना सीमेपर्यंत सोडण्यात येत आहे. परराज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी जशी सोय केली जात आहे तशीच राज्यातील लोकांसाठीही करण्यात आली आहे. काहीजण कामानिमित्त, शिक्षणासाठी, पाहुण्यांकडे गेले असताना किंवा पर्यटनासाठी गेल्यावर अडकून पडले आहेत. अशा लोकांना घरी जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास कऱण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून इ पास दिला जात आहे. यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी नियमावली तयार केली आहे.  त्यांनी दिलेल्या प्रक्रियेनुसार  http://covid19.mhpolice.in वर E-Pass साठी अर्ज करता येतो.

संबंधित बातम्या

संकेतस्थाळावर गेल्यानंतर तुम्हाला Apply for Pass Here पर्याय दिसेल. त्यावर विचारेलेली माहिती नीट भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडा. सर्व माहिती दिल्यानंतर Submit बटन क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला टोकन आयडी मिळेल. पास मंजूर झाल्यानंतर तो http://covid19.mhpolice.in   वर मिळेल. हे वाचा : छोट्या करदात्यांना मोठा दिलासा; करकपात कमी, इनकम टॅक्स भरण्याची मुदतही वाढली फॉर्म भरताना फक्त इंग्रजी भाषाच वापरता येते. तसंच सर्व कागदपत्रांची एकच फाईल तयार करावी. तुमचा ई पास मिळाल्यानंतर त्याची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्याजवळ प्रवास करताना ठेवा. हे वाचा : सर्वसामान्य नागरिकांना 3 वर्षांसाठी जाता येईल भारतीय लष्करात? ई पाससाठी एकापेक्षा जास्तवेळा अर्ज करू नका. तुम्हाला मिळालेला टोकन आयडी सेव्ह करून ठेवा. तसंच अधिकृततेशिवाय वैधतेपलिकडं हा पास वापरू नका. हे वाचा : कोरोनामुळे पती गमावलेल्या शिक्षिकेलाही लागण, तिनेही दुसऱ्याच दिवशी सोडले प्राण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या