JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार

सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरु करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल: कोरोना विषाणूचा ( कोविड-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतात महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये त्याचप्रमाणे अभिनव विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. हेही वाचा… मालेगाव बनला कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’, मात्र कोणीही गांभीर्याने घेण्यास तयार नाही! वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या व अद्याप पर्यंत कोविड-19 प्रयोगशाळा नाहीत. कोल्हापूर, जळगाव, बारामती, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, लातूर, नांदेड व अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात याव्यात त्याचप्रमाणे सर्व खासगी आणि अभिनव विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अशा तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांना दिल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, एकूण बाधितांची संख्या 31 वर सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी याबाबतचे प्रस्ताव आजच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नवी दिल्ली यांच्याकडे पाठवावेत,  अशा सूचना वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी पत्राद्वारे सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरु करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला असून हे प्रस्ताव केंद्र शासनाकडून तातडीने मान्य करून घेण्यात येतील असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे. संपादन- संदीप पारोळेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या