JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ खडसेंना आणखी एक धक्का, भाजप आमदाराचा मार्ग मोकळा

एकनाथ खडसेंना आणखी एक धक्का, भाजप आमदाराचा मार्ग मोकळा

जळगाव जिल्हा दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 16 नोव्हेंबर :  एकनाथ खडसे यांना आणखी एक धक्का बसला आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून भाजपा आमदाराच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत  चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंविरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र याविरोधात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी  खडसे यांनी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यानं एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे याचिका फेटाळण्यात आल्यानं आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिका फेटाळली  जळगाव जिल्हा दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून  लावली आहे. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे एकनाथ खडेस यांच्यापुढील आव्हान मात्र आता वाढले आहे. हेही वाचा :      शिवसेनेचा वाघ बाहेर आलाय आता…, राऊतांच्या जामिनावर खडसेंची प्रतिक्रिया काय आहे नेमकं प्रकरण?   जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांच्या  विरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी दाखल केली आहे. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांना मुक्ताईनगरमधून निवडणूक लढवता येणार नाही असा दावा एकनाथ खडसेंनी केला . त्यानंतर याविरोधात मंदाकिनी खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान  खडसेंचा हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. खडसेंचा दावा फेटाळण्यात आल्यानं भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  त्यामुळे आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या