JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईत लपलेल्या 11 तबलिगींच्या मुसक्या आवळल्या, धक्कादायक माहिती आली समोर

मुंबईत लपलेल्या 11 तबलिगींच्या मुसक्या आवळल्या, धक्कादायक माहिती आली समोर

तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे असून त्यात 6 महिलांचा समावेश आहे.

जाहिरात

तबलिगी जमातीची सुरुवात 1926 मध्ये मेवात प्रांतात झाली. या जमातीची स्थापना मौलाना मुहम्मद इलियास यांनी केली होती. या जमातीचं मुख्य काम हे संपूर्ण जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणं हे आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 एप्रिल: मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथे लपून बसलेल्या 11 तबलिगींना मुंबई पोलिसांनी अटक केली. धक्कादायक म्हणजे 11 पैकी 1 तबलिगी कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. तबलिगी जमातचे हे सगळे सदस्य इंडोनेशियाचे असून त्यात 6 महिलांचा समावेश आहे. सगळ्यांना कोर्टात हजर केलं असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबई पोलिसांनी वांद्रे येथून तबलिगी जमातीच्या 11 सदस्यांना अटक केली. सगळे एका खोलीत लपून बसले होते. या सगळ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचा क्वारंटाइनचा कालवाधी संपल्याने आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हे सगळे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. हेही वाचा.. पुण्यात आठवड्याभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ, 1300 वर गेला आकडा वांद्रे येथे इंडोनेशियातील तबलिगी जमातचे सदस्य लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांतर दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते तर 10 जणांना 20 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. सगळ्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना 22 एप्रिलला अटक केली होती. आरोपींना कोर्टात हजर केले असता सगळ्यांना 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हेही वाचा..  48 तासांत कोरोनामुळे 3 सहकारी गमावल्याचं ऐकून पोलिस अधिकाऱ्याला रडू कोसळलं दरम्यान, दिल्लीतल्या निजामुद्दीन मध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली. दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांमुळे देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. संपादन- संदीप पारोळेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या