JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विदर्भात कोरोना पसरला, नागपूर-गोंदियात आढळले 5 रुग्ण!

विदर्भात कोरोना पसरला, नागपूर-गोंदियात आढळले 5 रुग्ण!

महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही 135 वर पोहोचली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 27 मार्च : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशाची उपराजधानी नागपूरमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये आज आणखी 5 नवे रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 9 वर पोहोचली आहे. नागपुरात आज आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. 4 रूग्ण हे नागपूरमध्ये तर 1 रुग्ण गोंदियामध्ये आढळला आहे.   दिल्लीतून नागपुरात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. गुरुवारी ज्या रुग्णाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला  होता त्याच्याच परिवारातील 3 लोकं आणि एका मित्राला लागण झाल्याचं समोर आले आहे. या पाचही जणांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा - ‘कोरोना’विरोधात लढ्यात शिवसैनिक पुढे सरसावले, संजय राऊतांनी केली घोषणा याआधीही सर्वात आधी यवतमाळमध्ये 2 रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही  135 वर पोहोचली आहे.  तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात  ‘कोरोना’ सर्व्हे तरदुसरीकडे, नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरात सर्व्हेची घोषणा केल्यानंतर लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतर्ग़त येणाऱ्या सुमारे 64 हजार कुटुंबातील 2 लाख 60 हजार लोकांपर्यंत मनपाच्या आरोग्य विभागाची टीम पोहोचली. आता या दोन झोन व्यतिरिक्त संपूर्ण नागपूर शहरात सर्व्हे होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. हेही वाचा - येत्या 12 तासांत हवामान मोठा बदल, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर महानगरपालिकेचे उर्वरीत आठ झोनमध्येही हा सर्व्हे करण्यात येणार आहे. ‘कोरोना’विषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या संपूर्ण सर्व्हेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र राहणार आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या