देशात कोरोनाचं संकट असतांना महागाईसुद्धा वाढली आहे. आर्थिक मंदीत सामान्य माणसांना मोठा फटका बसला आहे. अशा वातावरणात दिलासा देणारी बातमी आलीय.
बीड, 11 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहे. बीड जिल्ह्यातही केवळ अत्यावश्यक सेवा,प्रसार माध्यम आणि प्रशासनास पेट्रोल आणि डिझेलची विक्री करण्याची परवानगी आहे. पण, जिल्ह्यात सर्रास टपरी,किराणा दुकानवर 150 रुपये लिटरने पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजलगाव तालुक्यातील माऊली फाटा येथील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लॉकडाउनमध्ये पेट्रोल, डिझेल बेकायदेशीररित्या चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. हेही वाचा - कोरोनाव्हायरसची लस तयार करण्यासाठी लागणार आणखी 5 महिने, ‘या’ देशाने केला दावा कोरोनाच्या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त रस्त्यावर कोणी ही दिसू नये म्हणून जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्वसामान्य माणसास पेट्रोल विक्रीवर बंदी घातली होती. याच गोष्टीचा फायदा घेत काही लोकांनी पेट्रोलची काळाबाजारी सुरू केली आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण एका पेट्रोल विक्री करणाऱ्यास पेट्रोलमध्ये रॉकेल मिक्स केल्यामुळे त्याची गाडी बंद पडली असल्याने जाब विचारत आहे. तसंच पेट्रोल 150 रुपयाने विकत घेतल्याचंही बोलत आहे. त्याच वेळी दुसऱ्या मोटरसायकल स्वारही त्या ठिकाणी पेट्रोल घेत असल्याचं दिसून आलं आहे. हेही वाचा - राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा, PMच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरेंची मागणी या व्हिडिओमुळे पेट्रोलची काळाबाजरी उघड होत आहे. या पेट्रोलमध्ये रॉकेल मिक्स असल्यामुळे गाडी बंद पडल्याने मिलिंद उजगरे या तरुणाला आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास उशीर झाला. दीडशे रुपये लिटरने विक्री केली जात असल्याच तो सांगत आहे. पेट्रोलच्या या काळ्याबाजारामुळे प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पेट्रोल माफियांवर कारवाई होणार का, हे पाहण्याचे ठरणार आहे. संपादन - सचिन साळवे