JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अजित पवारांच्या 'बारामती पॅटर्न'ला यश, शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने

अजित पवारांच्या 'बारामती पॅटर्न'ला यश, शहर कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने

बारामती पॅटर्नच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केल्याने यश येताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 24 एप्रिल : बारामतीत कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींपैकी चार रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या रूग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबवलेल्या ‘बारामती पॅटर्न’ला यश येत असून तालुक्यात कोरोना संसर्ग झालेला एकच रूग्ण राहिला आहे. त्याच्यावर देखील उपचार सुरू असल्याने बारामतीतील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बारामती शहरात प्रथम एका रिक्षाचालकाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर भाजीपाला विक्रेत्याच्या कुटुंबातील पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी कळवले होते. या कुटुंबांतील वयोवृद्ध असणाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता, तर याच कुटुंबातील मुलगा, सून यांच्यासह आठ वर्षाच्या आणि एक वर्षाच्या नातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. चौदा दिवसांनंतर या रूग्णांची पुन्हा तपासणी केली असता त्यांचे सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे. रिक्षाचालकाचा देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दहा दिवसांपूर्वीच त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून बारामती येथील घरात त्यास होम क्वारान्टाइन करण्यात आले आहे. बारामती शहरात आता सात रूग्णांपैकी एकच रूग्ण राहीला असून मेडिकल दुकानात काम करीत असणाऱ्या वडिलांना कोरोनाचा संसर्गाची लागन झाली आहे. त्यांच्यावर देखील पुण्यात उपचार सुरू आहेत. हेही वाचा- कोरोनाच्या उपचारासंदर्भात चांगली बातमी, दिल्लीतील चाचणीला आलं मोठं यश बारामती पॅटर्नच्या माध्यमातून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केल्याने याला यश येताना दिसत आहे. शहरातील संपूर्ण परिसरात लॉकडाऊन करण्यात आले असून कुठल्याही नागरीकांना आता घरा बाहेर पडता येत नाही. सर्व अत्यावश्यक सुविधा मोबाईल अॅपद्वारे स्वयंसेवकांमार्फत घरपोच दिल्या जात आहेत. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या