JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / त्याने कोरोनाला हरवलं, अवघं शहर सुरक्षित झालं!

त्याने कोरोनाला हरवलं, अवघं शहर सुरक्षित झालं!

17 मार्च रोजी हा 23 वर्षीय रुग्ण थायलंडवरुन परत आला होता. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी गोंदिया, 11 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारांच्या वर पोहोचली आहे. शहराच्या शहर कोरोनाबाधित रुग्णांमुळे वेठीस धरली गेली आहे. परंतु, गोंदिया शहर हे आता कोरोनामुक्त झालं आहे. गोंदिया शहरात आढळलेला एकमेव कोरोना रुग्णाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्यामुळे गोंदियावासीयांचा जीव भांड्यात पडला आहे.  आज या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. हेही वाचा - ‘यापुढे सारासोबत काम करणार नाही’, बॉलिवूड अभिनेत्याचा स्पष्ट नकार 17 मार्च रोजी हा 23 वर्षीय रुग्ण थायलंडवरुन परत आला होता. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. शिवाय हा रुग्ण अनेकांचा संपर्कात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने अनेकांना होम क्वारंटाइन केलं होतं. तसंच संबंधित कोरोनाबाधित रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते, आज या तरुणाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हावासियासाठी सुखद बाब ठरली आहे, रुग्णालयातून निघताच डॉकटरांनी टाळ्या वाजवून या रुग्णाला निरोप दिला. तर कुटुबीयांनीही मुलगा कोरोना मुक्त होऊन घरी सुखरूप परत आल्याने घरच्या लोकांनी आरती ओवाळत त्याचा स्वागत केलं. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1574 वर दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1574 पर्यंत पोहोचली असून मृत्यूचा आकडा 110 पर्यंत पोहोचला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. मुंबईत रुग्णांची संख्या 1008 झाली असून मृतांचा आकडा 64 वर पोहोचला आहे. हेही वाचा - लॉकडाउनमध्ये पडले बाहेर, पोलिसांआधी पोहचला ड्रोन! अशी झाली लोकांची अवस्था महाराष्ट्रातील एकूण रुग्णाच्या 65 टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. तर देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी जवळपास 15 टक्के रुग्ण मुंबईत आहेत. शुक्रवारी मुंबईत एकाच दिवसात 218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या