JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! मुंबईतील मालाडमधून 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटव्ह रुग्ण बेपत्ता

धक्कादायक! मुंबईतील मालाडमधून 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटव्ह रुग्ण बेपत्ता

सध्या मालाडमधील पी वार्डात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होते आहे. अशातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून: मुंबईसह उपनगरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, मालाडमधील तब्बल 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे या रुग्णांना शोधण्याचं एक मोठं आव्हान महापालिकेसमोर उभं ठाकलं आहे. याबाबत महापालिकेने पोलिसांना एक पत्र पाठवून मदत मागितली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पी वार्डमधील हे सगळे रुग्ण आहेत. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे. हेही वाचा… रामदेव बाबांनी कोरोनावर आणलं पहिलं औषध, त्यावर काय म्हणाले अजित पवार सध्या मालाडमधील पी वार्डात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होते आहे. अशातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनाची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी माहिती वैद्यकीय विभागाकडून घेतली जात आहे. मात्र, नागरिक खरी माहिती लपवत असल्याची धक्कादायक प्रकारही समोर आली आहे. त्यात प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कर्मचारी चाचणी घेण्यास आलेल्या नागरिकांची माहिती अर्धवट किंवा चुकीची भरत असल्याचंही समोर आली आहे. आता बेपत्ता रुग्णांचा शोध घ्यायचा कसा, असा मोठा प्रश्न महापालिकेसमोर उभा आहे. पालिका अधिकारी तसेच पोलिस बेपत्ता रुग्णांचा शोध घेत आहेत. कोरोना रुग्ण दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत तर अनेकांचा फोन बंद असल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा… फडणवीसांचा गौप्यस्फोट, भाजपसोबत येण्याचा निर्णय फक्त अजित पवारांचा नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णांच्या नावांची यादी पोलिसांकडे सोपवली आहे. त्यानुसार पोलिस रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवत आहे. रुग्णांचा मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं जात असल्याचं पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या