nana patole
मुंबई, 09 मे : महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये धुसफुस असल्यानं अनेकदा समोर येत आहे. विशेषत: काँग्रेसची (Congress) प्रचंड नाराजी अनेकदा पाहायला मिळत आहे. त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रविवारी पुन्हा एकदा सरकारवर टीका केलीय. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय करता येईल यासाठी सध्या राज्य सरकार विविध अंगांनी विचार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोगानंतर आखणी एक नवीन आयोग बसवण्याच्या विचारात आहे. या मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारला सुनावले आहे. समाजाला माग ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. त्यामुळं नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, असं म्हणत पटोले यांनी सरकारला सुनावलं आहे. (वाचा- पुण्यातील काँग्रेस नेत्याविरोधात हिंसाचाराचा आरोप, सुनेने केला गुन्हा दाखल ) राऊतांवर टीका संजय राऊतांबाबतही पुन्हा एकदा काँग्रेसची नाराजी पटोले यांनी बोलून दाखवली. संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना वाचणं आम्ही बंद केलं असल्याचंही पटोले यावेळी म्हणाले आहे. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित राऊत यांना माहिती नसावे असं पटोले म्हणाले. स्वबळाची तयारी पुढची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या मुद्द्यावरही पटोले यांनी परखड मत मांडले. महाराष्ट्रात निवडणूक हा प्रत्येक राजकीय पक्षाचा भाग असतो. प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीने तयारी करत असतात. तशीच काँग्रेसही पूर्ण राज्यात तयारी करतो. इंटक बरोबर बैठक झाल्याचं सांगत विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करायला त्यांना सांगितल्याचं पटोले म्हणाले. (वाचा- गेट वे पडला ओस, पर्यटन बंदीमुळे 10 हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! ) भाजपवर हल्लाबोल भाजप यांच्या सरकार पाडण्याच्या वक्तव्यावरूनही पटोले यांनी भाष्य केलं. भाजपा हे पोथी-पुराण वाले असून ते रोज नवनवीन तारखा काढत पाहतात. कायम कुणी तरी मरावे यासाठी ते तारखा काढतात. खरं तर भाजपला त्यांचे लोक पळून जातील ही भीती आहे, त्यामुळं ते नवनवीन तारखा देत राहतात असंही पटोले म्हणाले. मुनंगटीवार यांनी अनेकदा राष्ट्रपती राजवटीबाबत भाष्य केलं, पण काय झालं असं म्हणत महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचं ते म्हणाले. सोनिया गांधी यांनी महामारी यासाठी अनेक सूचना केल्या. केंद्र सरकारने मात्र पालन केले नाही त्यामुळं देशात वाईट स्थिती झाली. दरेकर काय बोलतात, सीएम काय टीका करतात यापेक्षा लोकांचे आज जीव जातात त्याला केंद्र जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर लगावला.