JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न'', नाना पटोलेंचा गंभीर आरोप

''गेल्या अडीच वर्षात NCP कडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न'', नाना पटोलेंचा गंभीर आरोप

गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसला (Congress) संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 16 मे: गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) काँग्रेसला (Congress) संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केलं आहे. तसंच 2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याची माहिती ही नाना पटोले यांनी दिली. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. हे काम सातत्याने सुरू आहे. याची तक्रार मी चिंतन शिबिरात हायकमांडकडे केली आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. Lunar Eclipse: चंद्रग्रहण लागलेलं असताना खाण्या-पिण्यासहित या गोष्टींची घ्या विशेष खबरदारी   चिंतन शिबिरात गेल्या अडीच वर्षातील राष्ट्रवादीच्या कुरघोडीचे अनेक उदाहरणं आम्ही आमच्या हायकमांड समोर मांडली. त्यांनी हे सर्व ऐकून घेतलं या संदर्भात आता पुढची रणनीती ठरवली जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. देशाची स्थिती श्रीलंकेसारखी झालीय. भाजपने धर्म आणि जातीचं राजकारण केलं. उदयपूरच्या शिबीरात देश हिताचं चिंतन झालं असं म्हणत 2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ऐकला चलो रे वर काँग्रेस ठाम असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचं चिंतन शिबिर संघटना मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीतीची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी काँग्रेसने नवसंकल्प शिबिराचं (Congress Chintan Shivir news) आयोजन केलं होतं. मात्र, शिबिरात नेतृत्वाचा मुद्दा (Congress Party President) गाजला. यादरम्यान अनेक नेत्यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांनाही अध्यक्ष करण्याची मागणी (Demand for Priyanka Gandhi Vadra to be Congress President) केली. राजकीय घडामोडी समितीत झालेल्या चर्चेदरम्यान पक्षाचे नेते आणि धार्मिक नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना अध्यक्ष बनवण्याची जोरदार मागणी केली. प्रमोद कृष्णम यांनी ही मागणी केली, तेव्हा या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या