मुंबई, 02 मे: एक मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा अखेर औरंगाबादमध्ये (Aurangabad) पार पडली. सभेतल्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. आता राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या निर्वाणीच्या इशाऱ्याला अर्थ नसल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. काय म्हणाले नाना पटोले राज ठाकरे यांचा आजचा भाषण कधीकाळी त्यांना देवेंद्र फडणवीस त्यांनी सुपारीबाज म्हटलं होतं. त्याच पद्धतीच भाषण होतं. आज जनतेच्या प्रश्नावर ते बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. महाराष्ट्रात भोंग्याच्याबाबत सर्वत्र कारवाई झालेली आहे.म्हणून राज ठाकरेंच्या 4 तारखेच्या निर्वाणीच्या इशाऱ्याला अर्थ नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा तमाशा बनवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो थांबवला पाहिजे, अशा शब्दात नाना पटोले यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर हल्लाबोल केला आहे. ‘‘दंगली करण्याचा प्रयत्न कोणी केला तर…’’, राज्य सरकारमधल्या मंत्र्याचा इशारा राज ठाकरेंच्या भाषणानंतर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकदा काय ते होऊनच जाऊ द्या, असं म्हटलं. राज ठाकरेंचं हे वक्तव्य महाविकास आघाडी सरकारनं गांभीर्यानं घेतलं आहे. जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी यावर इशारा देत म्हटलं की,राज्यात दंगे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास कारवाई तितकीच कठोर असेल. मटानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर गृहमंत्री वळसे पाटलांची महत्त्वाची प्रतिक्रिया राज्यात भोंगे महत्वाचा नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोगें काढले तर तुमच्या देवाचे कार्यक्रमांचे काय? असा परखड सवाल उपस्थितीत तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेतवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मे महिन्याचा पहिला आठवडा या राशींसाठी आहे भाग्यवान; रखडलेली काम मार्गी लागतील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरात सभा घेऊन 4 तारखेपासून भोंगे काढले नाहीतर हनुमान चालीसा वाजवू असा इशारा दिला आहे. त्यांच्या या सभेवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील खोडद येथील एका जाहीर कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली.