JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे 'त्यांचं' गुणगान गातायत; प्रणिती शिंदेंची राज ठाकरेंवर टीका

लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे 'त्यांचं' गुणगान गातायत; प्रणिती शिंदेंची राज ठाकरेंवर टीका

मनसे ही भाजपला सी टीम मिळाली आहे. एकेकाळी भाजप विरोधात ‘लाव रे तो’ व्हिडिओ म्हणणारे त्यांचे गुणगान गात आहे. (praniti shinde on raj thackeray) निवडणुकीदरम्यान हे सर्व मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे मागे टाकतात. महागाई सारखी मुद्दे सोडून असे मुद्दे धरायचे याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करत असल्याची टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (mla praniti shinde) यांनी सोलापुरात केली.

जाहिरात

प्रणिती शिंदे (File Photo)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 6 एप्रिल : मनसे ही भाजपला सी टीम मिळाली आहे. एकेकाळी भाजप विरोधात ‘लाव रे तो’ व्हिडिओ म्हणणारे त्यांचे गुणगान गात आहे. (Praniti shinde on raj Thackeray) निवडणुकीदरम्यान हे सर्व मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे मागे टाकतात. महागाई सारखी मुद्दे सोडून असे मुद्दे धरायचे याचा काँग्रेस पक्ष धिक्कार करत असल्याची टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी सोलापुरात केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांनी भाजपाचे कौतुक करत शिवसेना तसेच राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली होती. यानंतर अनेक जणांना प्रतिक्रिया दिल्या. आता प्रणिती शिंदे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुनमगेट येथे महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकार विरोधात सडकून टीका करत केंद्र सरकारला लक्ष्य केले. प्रणिती शिंदे ऑन ईडी  - केंद्रीय यंत्रणेचा काँग्रेस सरकारने कधीही दुरुपयोग केला नाही. केंद्रीय यंत्रणांचा असा वापर करण्याची काँग्रेसची संस्कृती नाही. ईडी एक मोठी संस्था आहे. कुणी काहीही केले तरी ईडी आणतात. कोल्हापुरातही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले होते, पेटीएम केले तरीही ईडी आणू. यातून भाजप वाल्यांसाठी ईडी काम करते हे स्पष्ट होत असल्याची टीकाही प्रणिती शिंदे यांनी केले.

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ईडीच्या रडारवर? चौकशीला बोलवण्याची शक्यता

संबंधित बातम्या

काय म्हणाले होते राज ठाकरे? आज महाराष्ट्र राज्याचा विकास होत नाही याचे मुख्य कारण आपण जातीत अडकलो आहोत हे आहे. आपण जातीतून बाहेर पडून कधी हिंदू होणार आहोत? असा प्रश्न उपस्थित करत हा जातीयवाद कुणाला हवा आहे? (1999)ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असे म्हणत हा जातीयवाद शरद पवारांना हवा आहे असा थेट आरोप राज यांनी केला आहे. मात्र, आपण हा जातीय वाद असाच घेऊन बसलो तर आपली प्रगती होणार नाही, असही ते यावेळी म्हणाले आहेत. याचवेळी त्यांनी मतदारांना आपला स्वाभिमान गहान ठेऊ नका, मतदान सजगतेने करा असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या