सोलापूर,20 फेब्रुवारी: सोलापूर शहरात आज (गुरुवारी) पूनम गेट समोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ‘भाजप हटावो,देश बचाओ’ हे आंदोलन केलं. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर सडकून टीका केली आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमलाही चांगलाच धारेवर धरलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहांमध्ये विकृत मानसिकता दिसते, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. आमदार शिंदे यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल, राज ठाकरे यांच्या मनसेचा MIM ला इशारा आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशात वेगवेगळे कायदे आणून धर्म-जातीच्या आधारे विभागणी केली जात आहे. जात ही देशाला लागलेली कीड आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रथम भारतीय असल्याची भावना येते. कितीही कायदे आणून विभाजन करण्याचा प्रयत्न केले तरी देशाचे विभाजन होणार नाही, असा इशाराही आमदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दिला आहे. CM उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार? ‘कुठं गेलं रक्त, कुठं गेली वंचित-एमआयएम’ आमदार प्रणिती शिंदे यांनी ‘भाजप हटावो,देश बचाओ’ हे आंदोलनात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला चांगलाच धारेवर धरले. देशात सीएए, एनआरसी, एनपीआरसारखे कायदे लागू होत असताना दलितांवरील अन्याय दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना ‘कुठं गेलं रक्त, कुठं गेली वंचित-एमआयएम’, असा सवाल उपस्थित केला. सर्व भाजपचेच बगलबच्चे आहेत, असा घणाघातही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला. ‘वाह रे मोदी ‘तेरी चाल, वंचित-एमआयएम तेरे दलाल’ अस विधान करून दोन्ही पक्षांना प्रणिती शिंदे यांनी कडाडून टीका केली.