JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / College Student Dispute : कॉलेजमध्ये तुफान राडा, 3 जणांवर केले चाकूने सपासप वार, वाशिममधील घटना

College Student Dispute : कॉलेजमध्ये तुफान राडा, 3 जणांवर केले चाकूने सपासप वार, वाशिममधील घटना

वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात विद्याभारीत महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात अचानक 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

किशोर गोमाशे (वाशीम), 07 जानेवारी : वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरात विद्याभारीत महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात अचानक 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये रागातून एका विद्यार्थ्यांने चाकू हल्ला केला यामध्ये तीन जणांना चाकुने भोसकले तर यातील एकावर जोरदार वार झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. तीनही जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करणारा विद्यार्थ्याला कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाल्यामुळं एकच खळबळ उडाली असून कारंजा पोलीस पुढील तपास करत आहेत.

कारंजा शहरातील विद्याभारती महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांवर महाविद्यालय परिसरात चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज घडली. चाकूहल्ला करणारा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असून दोघांमधील आपसी वादामुळं हा हल्ला झाल्याचं समजते आहे.  

हे ही वाचा :  भीषण अपघातातून तरुण बचावला, मात्र काही क्षणात दुसरं संकट कोसळलं अन् गेला जीव; हृदय पिळवटून टाकणारी घटना

संबंधित बातम्या

दरम्यान तीनही जखमी विद्यार्थ्यांवर कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करणारा विद्यार्थ्याला कारंजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाल्यामुळं एकच खळबळ उडाली असून कारंजा पोलीस पुढील तपास करत आहेत.

पुण्यातही असाच प्रकार

अनेकदा क्षुल्लक कारणावरून झालेला वाद सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यातही कॉलेज भांडणाचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. कधी बॉयफ्रेंडवरून, तर कधी जेलसीवरून तर कधी रस्त्यावर ही भांडण पाहायला मिळतात. अशातच कुणी भांडणाचा व्हिडिओ काढून सोशल मिडीयावर टाकल्यानंतर चांगलाच व्हायरल झाला आहे.

साऊथ चित्रपटात सुध्दा पाहायला मिळणार नाही अशी दौंड तालुक्यातील वरवंड मधील  विद्यार्थांची तुफान हाणामारी दोन गटात झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयामधील एका गटाने दुसऱ्या गटाच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केले.

जाहिरात

हे ही वाचा :    Shocking: मगरींनी भरलेल्या पुलमध्ये चिमुकल्यानं मारली उडी, पुढे जे घडलं ते… Video Viral

आजूबाजूच्या नागरिकांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे ही मुलं शाळेत शिकायला जातात की हाणामारी करायला जातात असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या