सांगली, 02 ऑगस्ट: सांगली (Sangli) जिल्ह्यात महापुराचा (Flood Affected Area) फटका बसला आहे.. अनेकांची घरं पाण्याखाली गेली तर शेतीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. याच भागाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी पाहणी केली. पलूस तालुक्यातील भिलवडी नंतर अंकलखोप मध्ये ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. तर मुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांनी आपली गाऱ्हाणं मांडली. उद्धव ठाकरे यांनी आज पूराने प्रचंड नुकसान झालेल्या भिलवडीला भेट दिली. भिलवडीतील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंकलखोपला आले. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यावर संकटांची मालिका सुरूच आहे. आता आलेलं संकटही मोठं आहे. पण काळजी करू नका. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार आपलं आहे. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्यात येईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी अंकलखोपच्या पूरग्रस्तांना दिली. तसंच उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहेत. त्यात तुमच्याबाबत काय काय करायचं ते करू, असंही त्यांनी सांगितलं.
सरकार तुम्हाला आपत्तीमधून बाहेर काढेल माझ्याकडे सर्व रिपोर्ट आले आहेत. मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला वचन द्यायला आलो आहे. तुमच्यावर आपत्ती ओढवली. त्यातून तुम्हाला पुन्हा उभं करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. त्यातून मी तुम्हाला बाहेर काढेन, असं म्हणत मात्र तुम्ही ज्या पद्धतीने गर्दी केली ते भयानक आहे. कारण कोरोना अजून गेला नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणाऱ्या जिल्ह्यात सांगली आहे. त्यामुळे कोरोना होणार नाही याची काळजी घ्या, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. तुमच्यासाठी जे जे करणं शक्य आहे. ते ते आम्ही करू. भिलवडीकरांना आश्वासन संकट आलं की पॅकेज जाहीर केली जातात. ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. एवढ्या हजार कोटीचं पॅकेज. कुठे जातं कुणालाच माहीत नाही. मला अशी थोतांड येत नाही. मला खोटं बोलता येत नाही जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल. ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी भिलवडीतल्या पूरग्रस्तांना दिली. धक्कादायक! महाराष्ट्रात चार तासात अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून गँगरेप कठोर निर्णय घ्यावे लागतील- मुख्यमंत्री काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी पुनर्वसन करावं लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र त्यासाठी तुमच्या सर्वांची तयारी असली पाहिजे. पाण्याच्या पातळ्या मोजण्यासाठी आपलं आयुष्य नाही आहे. सरकार तुमच्या हिताचे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं वचन मी तुम्हाला देतो, असं मुख्यमंत्री भिलवडीतील पूरग्रस्तांना म्हणाले.