JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमित शाह मुंबईत आल्यावर भेटायला जाणार का? मुख्यमंत्री क्षणभर थांबले मग म्हणाले...

अमित शाह मुंबईत आल्यावर भेटायला जाणार का? मुख्यमंत्री क्षणभर थांबले मग म्हणाले...

अमित शाह मुंबईत आले तर त्यांच्या भेटीसाठी जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री क्षणभर थांबले.

जाहिरात

एकनाथ शिंदे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला. अमित शाह गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत येणार आहेत. ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. अमित शाह मुंबईत आले तर त्यांच्या भेटीसाठी जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री क्षणभर थांबले. त्यांनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतनीने प्रतिक्रिया दिली ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांममध्ये हशा पिकला. “आता ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि शिवसेना-भाजपची युती आहे. आपल्याला माहिती आहे सरकारच्या पाठीमागे… (मुख्यमंत्री हसले) आज शिवसेना भाजप युतीचं जे मजबूत सरकार स्थापन झालं आहे. यमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं योगदान आहे. त्यांनी आम्हाला सागितलं आहे, राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार पूर्णपणे पाठीशी आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित बातम्या

राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री काय म्हणाले? “सगळीकडे गणपतीचं आगमन झालेलं आहे. एक अतिशय उत्साह आणि आनंदाचं वातावरण आपण पाहतोय. गणेशोत्सावानिमित्ताने आपण एकमेकांकडे जात असतो. या निमित्तानेच आम्ही राज ठाकरे यांच्या घरी आलो आहोत. सदिच्छा भेट घेतली. त्यांचं मध्ये ऑपरेशन झालं होतं. त्यावेळी येता आलं नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. “आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट झाली. खरंतर त्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर येणार होतो. पण आज गणपतीच्या निमित्ताने भेट झाली. दिघे साहेबांच्या आठवणींबद्दल चर्चा झाली. आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या सानिध्यात काम केलेलं आहे. राज ठाकरेंनीदेखील बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाने राज्यात काम केलं आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी “एकनाथ शिंदे यांना दसरा मेळावा घेणार का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. दसरा अजून पुढे आहे. गणपती होऊद्या, नंतर आपण पुढे जाऊ”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या