JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दादरनंतर ऐरोवलीत कार्यकर्त्यांचा राडा, शिवसेना-भाजप समर्थक आमनेसामने, पाहा मारहाणीचा VIDEO

दादरनंतर ऐरोवलीत कार्यकर्त्यांचा राडा, शिवसेना-भाजप समर्थक आमनेसामने, पाहा मारहाणीचा VIDEO

दादरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक आणि शिवसैनिकांमधील राड्याची घटना ताजी असताना नवी मुंबईच्या ऐरोली येथूनही तशाच एका घटनेची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी मुंबई, 11 सप्टेंबर : दादरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे समर्थक आणि शिवसैनिकांमधील राड्याची घटना ताजी असताना नवी मुंबईच्या ऐरोली येथूनही तशाच एका घटनेची माहिती समोर आली आहे. ऐरोवलीमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित हाणामारीची घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या हाणामारी प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्साहाचा उत्साह होता. सर्वत्र भक्तीमय वातावरण होतं. अनंत चतुर्थीला सर्व भक्तांनी बाप्पाचा निरोप घेतला. बाप्पाला निरोप देत असताना मिरवणुकीत काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्याची माहिती समोर येत आहेत. मुंबईच्या दादर परिसरात राड्याची घटना ताजी असताना ऐरोवलीतही तशाचप्रकारची एक घटना समोर आली आहे. ऐरोवलीत विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. गणपती विसर्जन मिरवणूक समोरासमोर आल्यावर राडा झाला होता. संबंधित घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

( ‘हो, माझ्याकडे लायसन्स असलेली पिस्तूल, 30-40 जणांनी हल्ला केला, मग…’, सदा सरवणकरांनी सांगितली Inside Story ) संबंधित घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी माजी नगरसेवक एम.के मढवी, माजी नगरसेवक करण मढवी आणि माजी नगरसेविका विनया मढवी यांच्यासह 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या