JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'वर्षा'वर, रुग्णालयातून डिस्चार्ज

22 दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'वर्षा'वर, रुग्णालयातून डिस्चार्ज

22 दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज (discharged from the hospital) देण्यात आला आहे. 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून घरी परतले आहेत. मानेचं दुखणं सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री 22 दिवस रुग्णालयात होते. एचएन रिलायन्स रुग्णालयात त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. सकाळी केल्या जाणाऱ्या चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला, त्यानंतर मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह ते वर्षा या शासकीय निवासस्थानी रवाना झाले.

संबंधित बातम्या

बऱ्याच दिवसांपासून सुरु होता मान आणि मणक्याचा त्रास काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातून ऑनलाईन बैठका रुग्णालयात असतानाही उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आढावा बैठका यांना उपस्थिती लावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या