JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपुरातील रेल्वे अधिकाऱ्याने स्वत:च्या पैशातून गरजूंना केली मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं कामाचं कौतुक

नागपुरातील रेल्वे अधिकाऱ्याने स्वत:च्या पैशातून गरजूंना केली मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं कामाचं कौतुक

पाच वर्षांपूर्वी या अधिकाऱ्याने रूग्णालयातील गरजूंना अन्न पुरविण्यासाठी ‘सेवा किचन’ सुरू केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 8 एप्रिल : येथील एका रेल्वे अधिकाऱ्याला जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांचा फोन गेला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या अधिकाऱ्याला फोन करुन लॉकडाऊनमध्ये अडचणीत आलेल्या लोकांना मदत केल्याबद्दल व त्यांना आवश्यक साहित्य पुरविल्याबद्दल कौतुक केले. नागपूरमधील मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे कार्यालय  अधीक्षक खुशरु पोआचा यांनी विदर्भातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता ट्रकमध्ये किराण्याचे 540 किट पाठवले होते. पुढील 10 ते12 दिवस त्यांना अन्न मिळेल ही त्यामागील भावना होती. संबंधित -  केंद्रीय मंत्र्याचं अख्खं कुटुंब शिवतंय कोरोना योद्ध्यांसाठी सुरक्षा मास्क अनेक ठिकाणी सामुदायिक स्वयंपाक करणाऱ्यांना धान्य पाठविलं जात आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या गरजुंसाठी सामुदायिक स्वयंपाक करणाऱ्यांना पोआचा अन्न-धान्य पुरवित आहेत. पोआचा म्हणाले, ‘मी रेल्वेमध्ये काम करतो, पण गेल्या २० वर्षांपासून देशातील गरजूंना रक्तदान करून समाजसेवा करीत आहे. पाच वर्षांपूर्वी रूग्णालयातील गरजू लोकांना अन्न पुरविण्यासाठी मी ‘सेवा किचन’ सुरू केले आहे. त्यांनी देशातील 21 रुग्णालये आणि शाळांमध्ये फ्रिज आणण्यासाठी मदत केली आहे. सरकारकडून मदतीचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी पोआचा यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांनी मंगळवारी त्यांना फोन करुन कामाची प्रशंसा केली. याशिवाय सरकारकडून मदत देण्याचं आश्वासनही दिलं. यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पोआचा कोणाकडूनही पैसे न घेता सामाजिक कार्य करीत आहेत. यावेळी पोआचा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सरकारबरोबर काम करण्यास सांगितलं आहे आणि कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. संबंधित -  घराबाहेर पडताना मास्क अत्यावश्यक, नाहीतर अटक होणार संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या