JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दोन तास, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप, अखेर मध्य रेल्वेची वाहतूक सुरु, पाहा VIDEO

दोन तास, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप, अखेर मध्य रेल्वेची वाहतूक सुरु, पाहा VIDEO

मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.

जाहिरात

मध्य रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 19 सप्टेंबर : मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने संध्याकाळी काहीशी उसंत घेतली. त्यामुळे संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांनी काहीसा सूटकेचा श्वास घेतला. पण चाकरमान्यांचा रात्री आठ वाजेनंतर पुन्हा हिरमोड झाला. कारण मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास दोन ते अडीच तासांनी ही वाहतूक सुरु झाली. वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. मध्य रेल्वेच्या अप मार्गावर आसनगाव रेल्वे स्थानकावर मालगाडीटे कपलिंग तुटले होते. तर डाऊन मार्गावर कसारा-आटगाव जवळ मालगाडीचे इंजिन फेल झाले होते. त्यामुळे दोन-अडीच तासापासून लोकल आसनगाव रेल्वे स्थानकात उभी होती. आसनगाव रेल्वे स्थानकावर रात्री 8 वाजून 8 मिनिटापासून लोकल ट्रेन उभी होती. त्यामुळे प्रवाशीदेखील वैतागले होते. आसनगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या मनस्तापाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. पण आता लोकल पुन्हा सुरु झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलं.

संबंधित बातम्या

( महाराष्ट्रात जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीचा परवाना रद्द ) राज्यात आज दिवसभरात प्रचंड पाऊस पडलाय. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुबई-ठाण्याला तर आज पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे लोकल ट्रेनवरही त्याचा काहीसा परिणाम पडलेला बघायला मिळाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या