JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अनियंत्रित कारने वाटेत येणाऱ्या सगळ्यांना उडवलं; ठाण्यातील विचित्र अपघाताचा CCTV Video

अनियंत्रित कारने वाटेत येणाऱ्या सगळ्यांना उडवलं; ठाण्यातील विचित्र अपघाताचा CCTV Video

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये हा अपघात झाला. ज्यात कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने एका स्कूटरसह तीन लोकांना धडक दिली. (Thane Accident Video)

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमित राय, प्रतिनिधी ठाणे 25 सप्टेंबर : रस्ते अपघाताच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. मात्र, यातील काही अपघात इतके विचित्र असतात की सगळ्यांनाच थक्क करतात. अनेकदा अशा अपघातांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर येत असतात. ठाण्यातील अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात एका कारने अगदी क्षणभरात अनेकांना धडक दिल्याचं पाहायला मिळतं. पुणे हादरलं! नवरा-बायकोचं भांडण पाहून ओरडली 8 वर्षांची मुलगी, पित्याने केलं भयानक कृत्य ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये हा अपघात झाला. ज्यात कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारने एका स्कूटरसह तीन लोकांना धडक दिली. ही घटना डोंबिवलीतील पाथर्ली परिसरात घडली असून ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओमध्ये दिसतं, की कारवरील नियंत्रण सुटल्याने कार एकसोबतच एका स्कूटरसह तीन जणांना धडक देते. यानंतर हे सगळे खाली कोसळतात. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघात तीनजण जखमी झाले आहेत. VIDEO : पुण्यातली अतिशय वेदनादायी घटना, आईने पोटच्या लेकराला ट्र्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली जाताना पाहिलं समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता, की आधी ही कार एका स्कूटरवाल्याला धडक देते. यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या एका मुलीसह आणखी दोघांना धडक देत रस्त्याच्याकडेला असलेल्या खांबाला जाऊन धडकते. ही कार खांबाला धडकण्याआधी खांबाच्या आसपास असणारे सगळे लोक कारच्या धडकेनं खाली कोसळतात. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनेत तिघे जखमी झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या