मुला - मुलीमधील भेदभाव दूर करून स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी वडिलांची ही संकल्पना होती.
जालना, 07 मे : ‘आलीया गावात अजब वरात, पोराला घ्यायला पोरगी दारात….’ पोश्टर गर्ल’ ( poshter girl style movie ) या मराठी चित्रपटातील प्रसंग आज जालनेकरांना (jalana) प्रत्यक्ष याची देही याच डोळा अनुभवायला मिळालं. चक्क नवरी मुलगी घोड्यावर बसून लग्न मंडपात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लग्नाची वरात म्हटलं की घोडा, डीजे, ढोल ताशे, वराती आणि धांगडधिंगा. जालन्यातील आजच्या या वरातीत देखील हे सर्व गोष्टी होत्या. मात्र एकच वेगळेपण होत ते म्हणजे. घोड्यावर नवरदेव नव्हे तर चक्क नवरी बसलेली होती. हो ही वरात नवरदेवाची नव्हे तर चक्क नवरीची होती. रस्त्यात एका चौकात मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या आग्रहाखातर ही नवरी देखील घोड्यावरून खाली उतरली आणि फक्त उतरली च नाही तर डीजे आणि ढोल ताशांच्या तालावर बेधुंद होऊन थिरकली देखील.
गणपती नेत्रालयातून ऑप्टोमेट्रीस्टची पदवी घेतलेल्या अंजली डोईफोडेचा शुभ विवाह औरंगाबाद येथील सिध्दांत कांबळेशी आज जालन्यात पार पडला. या लग्नात शहरातून अंजलीची वरात काढण्यात आली. घोडी, डीजे, ढोल ताशे सह निघालेल्या या वरातीने ‘आलिया गावात अजब वरात… पोराला घ्यायला पोरगी दारात…‘पोस्टर बॉईज या मराठी चित्रपटातील प्रसंग आज जालनेकरांना प्रत्यक्ष याची देही याच डोळा अनुभवायला मिळालं. ( घरात भक्तीगीतांसाठी स्पीकर लावल्यावरून सुरू झाला वाद; मात्र, शेवट इतका भयानक ) मुला - मुलीमधील भेदभाव दूर करून स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी वडिलांची ही संकल्पना होती. आम्हाला खूप मजा आली, अशी प्रतिक्रिया नववधू अंजली ने न्यूज 18 लोकमत शी बोलताना दिली.