मुंबई, 21 ऑगस्ट : गणेशोत्सव (Mumbai Ganeshotsav) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबई महापालिकेने मंडळांसाठीची नियमावली (BMC Rules) जाहीर केली आहे. गणेशमूर्तींच्या उंचीबाबतचे निर्बंध हटल्यानंतर तसंच कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतरचा हा पहिलाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव आहे. पालिकेची कोरोना काळापूर्वीची जुनीच नियमावली यंदाच्या गणेशोत्सवात लागू असणार आहे. गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडप मात्र 30 फूट उंचीपर्यंतचेच असावेत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 25 फुटांपेक्षा उंच मंडप असेल तर मंडप बांधणीचा अहवाल पालिकेला सादर करणं गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक असेल. मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्याच प्रती खड्डा दोन हजार रुपयांचा दंड आकरला जाणार आहे. सार्वजिनक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान मंडप परिसरात पालिकेने तयार केलेल्या लोकोपयोगी भिंतीपत्रके, कापडी फलक प्रदर्शित करता येईल. मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्लू अशा साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे, त्यामुळे मंडप परिसर स्वच्छ ठेवणे ही मंडळाची जबाबदारी आहे, असंही या नियमावलीमध्ये सांगण्यात आलं आहे. गणेशोत्सवाआधी मुख्यमंत्र्यांची मंडळांसाठी मोठी घोषणा, ‘हे’ 5 दिवस 12 पर्यंत स्पीकरला परवानगी आवाजाची पातळी अधिक होणार नाही याची काळजी संबंधित मंडळांनी घेणं गरजेचं आहे. मंडपाच्या अंतगर्त भागात कुठल्याही प्रकारचा स्टॉल उभारता येणार नाही. वाहन आणि पादचऱ्यांसाठी राखीव जागा ठेवाव्या लागणार आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्थान, रिक्षा व टॅक्सी थांबे या ठिकाणी वाहनधारकांची ये जा होत असते, त्यामुळे या ठिकाणी मंडप उभारताना वाहनं आणि पादचऱ्यांसाठी जागा उपलब्ध होईल, याची काळजी मंडपांनी घ्यायची आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी मंडळांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे विसर्जनासाठी गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे घरगुती आणि सार्वजिनक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास कोरोना प्रसाराचा संभाव्य धोका टाळणे शक्य होईल, असं या नियमावलीत सांगण्यात आलं आहे. https/ shreeganeshvisarjan.com या लिंकवर विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. गणपती विसर्जन पंचगंगेतच! आमदार प्रकाश आवाडे आक्रमक, सनातनचा पाठिंबा, कोल्हापुरात नवा वाद पेटणार?