JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Black Magic in Shahapur Election: शहापुरमध्ये शिवसेना अन् काँग्रेस उमेदवारांना हरवण्यासाठी अघोरी प्रकार, धक्कादायक PHOTOS व्हायरल

Black Magic in Shahapur Election: शहापुरमध्ये शिवसेना अन् काँग्रेस उमेदवारांना हरवण्यासाठी अघोरी प्रकार, धक्कादायक PHOTOS व्हायरल

Crime in Thane: ठाणे जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायत निवडणुकीत आघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कृतीचे व्हिडीओज आणि फोटो आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शहापूर, 14 जानेवारी: ठाणे (Thane) जिल्ह्यातील शहापूर नगरपंचायत निवडणुकीत (Shahapur Election) आघोरी प्रकार (Black magic) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कृतीचे व्हिडीओज आणि फोटो आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral videos and photos) होत आहेत. ज्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांना हरवा, असा मजकूर लिहिलेला फोटो व्हायरल होत आहेत. जादूटोण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियात खळबळ उडाली असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. खरंतर, सध्या ओबीसी जागांवर निवडणूक घेण्यास स्थगिती देण्यात आली आहे. अशात शहापूर नगरपंचायतसह अन्य चार ठिकाणी निवडणुका पार पडत आहेत. येत्या 18 जानेवारीला संबंधित चार ठिकाणी मतदान होत आहे.  या निवडणुकीत भाजपासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. मात्र खरी लढत ही भाजप आणि शिवसेनेत होत आहे. हेही वाचा- पुण्यातील बड्या बिल्डरला अजितदादांच्या पीएच्या नावानं धमकीचा फोन, मागितले 20 लाख अशात निवडणुकीला रंग चढत असताना शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांच्या फोटोंचा आणि कागदाचा वापर करत अघोरी प्रकार केल्याचा व्हिडीओ आणि फोटोज शहापूर तालुक्यात चांगलेच व्हायरल होत आहे. निवडणूक आणि निकाल जाहीर होण्याआधी अज्ञात व्यक्तींकडून हे अघोरी कृत्य केलं गेलं आहे. शहापूर तालुक्यातील पठाणवाडा येथील एका पिपंळाच्या झाडाखाली हे जादूटोणा केलेल्या संशयित कागदं आढळून आले आहेत.

अज्ञात आरोपींनी शिवसेनेच्या उमेदवार रजनी संतोष शिंदे, मालती म्हात्रे, विजय भगत, जान्हवी देशमुख (काँग्रेस) यांच्यासह अन्य दोन उमेदवारांच्या नावानं चिठ्या बनवून त्यावर उमेदवाराचे  फोटो व निशाणी लावली आहे. तसेच या कागदावर ‘त्यांची हार होऊ दे’ असा मजकूर लिहिला आहे. संबंधित कागदावर अघोरी कृत्य आणि उतारा करून त्या चिठ्या एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवल्या होत्या. काही स्थानिक नागरिकांना या चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. तसेच संबंधित झाडाखाली काहीतरी पेटवून त्याच्या बाजूला ह्या चिठ्या ठेवल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या