नितेश राणे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करताच “मी सभा सोडून जाऊ का?”
मुंबई, 05 फेब्रुवारी : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणामुळे (shivsena worker attack case) भाजपचे आमदार नितेश राणे (bjp mla Nitesh Rane) पुरते अडचणीत सापडले आहे. जामीन अर्जासाठी धावाधाव करत असताना आणखी एक दिवस कोठडीत मुक्काम वाढला आहे. भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar pass away) यांच्या निधनामुळे सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्याची सुनावणी पुढे ढकलली आहे. शिवसैनिक हल्ला प्रकरणामुळे नितेश राणे मागील चार दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस कोठडीतून सुटका झाल्यामुळे नितेश राणे जामीन अर्जासाठी धावाधाव करत आहे. पण, रविवारची सुट्टी आल्यामुळे सुनावणी सोमवारी ढकलण्यात आली होती. उद्या सोमवारी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालायत सुनावणी होणार होती. दुपारी दोननंतर सुनावणी होण्याची शक्यता होती. पण, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी सुनावणी उद्या होणार नाही. नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. पण, आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे. जेलमध्ये न जाता रुग्णालयात दाखल 2 दिवसांची कणकवली पोलिसांची कोठडी नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने सुनावली झाली. त्यानंतर ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांची रवानगी कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. छातीत दुखत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. त्यानंतर सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात हृदय रोग तज्ञ नसल्याने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू झाली. तसंच मुंबईत पाठवलेले वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. दुसरीकडे नितेश राणे यांना जामीन मिळावा या करता त्यांचे वकील सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयात गेले खरे मात्र तपास अधिकारी उपस्थित राहिले नाही आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे प्रकरण दुसऱ्या कोर्टात वर्ग करावे असा अर्ज केल्याने नितेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक खंडाजंगी झाली. त्यामुळे सुनावणी सोमवारी ढकलली होती.