संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर राजकीय विरोधक आहे. आता पुन्हा एकदा त्यांना संधी देऊन शिवसेना राठोडांना शह देणार...
यवतमाळ, 15 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. पण, दुसरीकडे आता शिवसेना यवतमाळमध्ये भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे नेते आणि माजी आमदार संजय देशमुख शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि भाजपचे नेते तथा दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. येत्या 20 ऑक्टोबरला देशमुख हे शिवबंधन बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती प्रवेश करणार आहे. यवतमाळमध्ये शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले. (शिंदे गटाच्या ढाल तलवार चिन्हावर मोठा आक्षेप, रद्द करण्याची मागणी) संजय राठोड यांना शह देण्यासाठी भाजपचे माजी आमदार संजय देशमुख हे गळाला लागले आहे. संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर राजकीय विरोधक आहे. संजय देशमुख हे 1999 मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. आता पुन्हा एकदा त्यांना संधी देऊन शिवसेना राठोडांना शह देण्याच्या तयारीत आहे. कोण आहेत संजय देशमुख? 1998 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्द सुरू केली. संजय राठोडांसोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र, 1999 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक आहेत. (शिंदे-फडणवीसांना वेळ दिला पाहिजे, असं का म्हणाले नाना? VIDEO) संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. 2009 मध्ये मतदारसंघाच्या पूनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होता. या निवडणुकीत तत्कालीन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मतदान घेतलं होतंय. देशमुख शिवसेनेत आल्यास दिग्रस विधानसभेसह यवतमाळ लोकसभेसाठी सक्षम उमेदवार ठरू शकतात.