JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका का? भाजप नेत्याचा रोखठोक सवाल

गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका का? भाजप नेत्याचा रोखठोक सवाल

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सार्वजनिक गणेशोत्साहाबाबत गाईडलाईन जारी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जुलै: यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना विषाणूचं सावट आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सार्वजनिक गणेशोत्साहाबाबत गाईडलाईन जारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना निर्बंध घालते आहे. मात्र, विरोधी पक्ष भाजपनं राज्य सरकारच्या विरोधी भूमिका घेतली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची बोटचेपी भूमिका का? असा रोखठोक सवाल देखील शेलार यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा… महाराष्ट्राकडेही देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य आशिष शेलार यांनी ट्वीट करून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सार्वजनिक गणेश मंडपांची परवानगी घ्या, असं आवाहन केलं आहे. गेल्या वर्षीच्या आकड्यांच्या आधारे मनपाने गणेश मंडपांना परवानगी द्यावी, अशी मागणी देखील शेलार यांनी केली आहे. गणोशोत्सवाबद्दल पक्षाने दिलेल्या न्यायालयीन लढ्याची शेलार यांनी यावेळी आठवण करुन दिली आहे. या वर्षी खंड पडल्यास त्याचा संदर्भ घेत भविष्यात अडचण येऊ नये, याकरता शेलार यांनी आवाहन केल्याचं म्हटलं आहे. काय म्हणाले आशिष शेलार? ‘सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन! कृपया सर्व गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीही मंडपाची परवानगी पालिकेकडून घ्या…गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची की नाही, हा निर्णय तुमचा.. पण परवानगी घ्या…न्यायालयीन लढ्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या भविष्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे.’

21 व्या शतकाचे “ज्ञान मंदिर” उभारणीची पायाभरणी.. अयोध्येत “राम मंदिराचे” भूमिपूजन होत असतानाच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 21 व्या शतकाचे “ज्ञान मंदिर” उभारणीची पायाभरणी केली. तब्बल 34 वर्षानंतर देशाचे शैक्षणिक धोरण बदलून, बदलत्या काळाला सामोरे जाण्याचे सामर्थ्य असलेली पिढी घडविण्यासाठी दमदार पाऊल टाकल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

घोकमपट्टीला आता रामराम करुन विद्यार्थ्यांच्या मुलभूत कौशल्याचे मुल्यमापन होईल. आता नवे शैक्षणिक धोरण कारकून नाही तर देशाची उभारणी करणारी नवी कौशल्य असलेली पिढी समोर घेऊन येईल. शिक्षण आनंदायी होईल. नवे संशोधनाला चालना मिळेल. देशाला सामर्थ्यवान घडविण्याची ही नवी वाट मिळणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासाचा विचार करण्यात आला असून 3 वर्षांच्या बालकांपासून त्यांच्या पालकापर्यंत आणि शिक्षकांपासून वर्ग,परिक्षा,मुल्यांकन या सगळ्यांचा सखोल विचार करण्यात आला आहे.त्यामुळे विद्यार्थी हा परिक्षार्थी न राहता ज्ञानार्थी होईल, असंही शेलार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा… भारुडात करायचा ‘स्त्री’ भूमिका! चिडवायची मुलगी, ‘कंचना’ सिनेमा पाहून केली हत्या नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपर्यंत स्थानिक भाषेतून शिक्षण देण्यात येणार असून पुढील शिक्षण ही स्थानिक भाषेतून घेता येईल. तसेच भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य राज्य आणि विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. एकूणच हे नवे धोरण प्रगतीचे पंख देणारे आहे, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या