चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.
पुणे, 25 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत सभांचा धडाका लावला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती (BJP and MNS alliance) होईल अशी चर्चा रंगली आहे. मात्र, ‘राज ठाकरे भविष्यातील मित्र असतील अशी आता काही शक्यता नाही. त्यांच्यासोबत युतीचा चा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणी घेतील, पण आता युतीचा विषय नाही’ असं स्पष्ट उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी दिलं. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मनसेसोबत युतीची चर्चा फेटाळून लावली. किरीट सोमय्यांवर हल्ला झाला, पुण्यात किमान 200 ठिकाणी निदर्शने व्हायला हवी होती पण पुण्यातील पदाधिकाऱ्यांना महापालिकेशिवाय भाजप माहीतच नाही. आपण केवळ नगरसेवक म्हणून केवळ काम करण्यासाठी जन्माला आलो नाही आपण राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांची कानउघडणी केली. ( सचिन तेंडुलकर, उद्धव ठाकरे आणि 315, दोन्ही मुंबईकरांचं या नंबरशी आहे खास कनेक्शन ) ‘माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो. अनेकांना वाटतं मी कधी हिमालयात जातो. मी लक्ष देत नाही. कोल्हापुरात 40 हजारच मत पडली असती तर मला पाय ठेऊ दिला नसता पण तिथे कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केलं आणि यशापर्यंत पोहोचलो, असंही पाटील म्हणाले. पुणे महापालिका निवणुकासप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकतील पण राजकारणात एका रात्रीत काहीही होऊ शकतं, असं संकेतही पाटील यांनी दिले. ( गावकऱ्यांकरवी मारहाण, मानसिक छळ अन्..;पत्नी पीडित पतीने पोलिसांसमोर मांडली व्यथा ) मिटकरी यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे वर केलेलं भाषण क्लिप फिरतेय ते बघा. तुम्हाला कुणी कशासाठी आडवलं नाही. हनुमान चालिसा म्हणायला येत होते ते स्वागत करायला हवं होतं फसवून बनवलेले सरकार तुमचं आहे, असा टोलाही पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. पवारांनी त्यांचा इतिहास चेक करावा ते कसे पार्ट्या जोडत होते. त्यांनी तोडफोड करून सरकार स्थापन केलेली पुलोद त्याचं उदाहरण आहे. पवार असे म्हणाले होते की काँग्रेस मध्ये जाण्याऐवजी मी अंगाला राख फासून हिमालयात जाईल ते गेले नाही. मी म्हटलं होतं मी हरलो तर हिमालयात जाईल. मग ते गेले नाही, माझ्या जाण्याचा प्रश्नच नाही, असंही पाटील म्हणाले.