नागपूर,18 फेब्रुवारी: एलायन्स अगेंस्ट CAA, NRC and NPRचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येबाबत खळबळजनक आरोप करून नवा वाद निर्माण केला आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तूलने झाली होती, असा आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे. नागपूरच्या जाफरनगर भागात 16 फेब्रुवारी रोजी एलायन्स अगेंस्ट CAA NRC आणि NPRच्या वतीने ‘संविधान बचाओ सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या बी.जी.कोळसे पाटील यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून खळबळ उडवून दिली. बी.जी.कोळशे पाटील म्हणाले, हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब किंवा इतर कोणत्याही पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळ्यांनी झाला नाही. तर हेमंत करकरे यांना महाराष्ट्र पोलिसांच्या ‘पॉईंट नाईन’ या पिस्तूलने पाठीमागून गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. हे कृत्य मुंबई पोलिस दलातील कोणी हिंदुत्ववादी किंवा मनुवाद्याने केले असावे, असा खळबळजनक दावा कोळशे पाटील यांनी केला आहे. ‘मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केला तर पुढचा जन्म कुत्रीचा’, स्वामींची मुक्ताफळं कर्नल पुरोहितने सुरुवातीला मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावर काम केले, मात्र नंतर तोच कर्नल पुरोहित मोहन भागवत यांच्या हत्येचा कट रचत होता. त्याने तशी सुपारी काही शार्प शूटर्सला दिली होती, असा आरोपही कोळशे पाटील यांनी यावेळी केला. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी प्रत्येक परदेश दौऱ्यावर महिलांना सोबत न्यायचे, असे त्यांचे हिंदुत्व होते. तसेच अटलबिहारी यांनी बाबरी मशिदीबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या दगा दिला होता, असा आरोपही कोळशे पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. हा धाडसीपणा नव्हे मूर्खपणा; ‘त्या’ व्हिडिओवर रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला संताप