रत्नागिरी, 3 जून: राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना दुसरं एक मोठं संकट येऊन ठेपलं आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळान आता रौद्र रूप धारण केलं असून थोड्याच वेळात ते किनारपट्टीवर धडकणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली परिसरात चक्रीवादळाचा फटका बसायला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मिर्य बीचवर समुद्रात मोठ मोठ्या लाटा उसळल्या आहेत. समुद्रात जहाज अडकलेलं दिसत आहे.
हेही वाचा.. मोठी बातमी! ‘निसर्ग’ वादळानं घेतलं रौद्र रूप, कोकणाच्या उंबरठ्यावर पोहोचलं निसर्ग चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते 50 किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. आता ते मुरुडला धडकणार आहे. तरी देखील या चक्रीवादळाचा धोका मुंबईसह कोकण किनारपट्टीवर होणार आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इगतपुरी, नाशिक,चांदवड, मालेगाव असा निसर्ग चक्रीवादळाचा वेग असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हेही वाचा.. मुंबई, ठाणे, नाशिकसाठी पुढचे 4 तास महत्त्वाचे! या गोष्टी केल्यात का?