JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhandara: कपडे धुवायला गेलेल्या महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला, जादूटोण्याच्या संशयातून महिलेची निर्घृण हत्या

Bhandara: कपडे धुवायला गेलेल्या महिलेचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला, जादूटोण्याच्या संशयातून महिलेची निर्घृण हत्या

Crime News: कपडे धुवायला गेलेल्या 45 वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 3 मे : मनात संशयाने घर केले कि किती मोठा अनर्थ घड़तो याची प्रचिती भंडाऱ्यात (Bhandara) आली. जादूटोणा (superstitious)  करत आपल्या पत्नीला मारल्याचे कारण समोर करत एका आरोपीने मित्राच्या मदतीने 45 वर्षीय महिलेची हत्या (45 year old woman killed) केल्याची घटना समोर आली आहे. डोक्यावर काठीने वार करत गळा दाबून महिलेची हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत नवेगांव येथे घडली आहे. राजहंस कुंभरे, विनोद रामटेके दोन्ही रा. नवेगाव (कोका) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. (Bhandara woman killed over superstitious beliefs) कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव येथील कपडे धुवायला गेलेल्या बबिता तिरपुडे या महिलेचा 28 एप्रिल रोजी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. डोक्यावर काठी मारून व गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते. वाचा :  ‘रशियन मुलगी पाठवा..’; भाजपच्या महिला नेत्याच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे, पतीचं सेक्स रॅकेट कनेक्शन समोर याप्रकरणी कारधा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली. यावेळी आरोपी राजहंस कुंभरे याने मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाला, या संशयाचा मनात राग धरून बदला घेण्यासाठी बबिता तिरपुडे हिची हत्या केली अशी कबुली दिली. विनोद रामटेके याच्या मदतीने हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. दोन्ही आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत. उजैनमध्ये मांत्रिकाचा मुलीवर अत्याचार उजैनमध्ये एका मांत्रिकाने गतिमंद असलेल्या 21 वर्षांच्या तरुणीला भूतबाधा झाल्याचं सांगून तिच्यावर बलात्कार केला आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. या बद्दलचं सविस्तर वृत्त ‘आजतक’ने प्रकाशित केलं आहे. मध्य प्रदेशात जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाने 21 वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील पीडितेवर उपचार करून तिला सामान्य करण्याच्या आशेने तिची आई तिला मांत्रिकाकडे घेऊन गेली होती. तिथे नेल्यानंतर मांत्रिकाने आईला खोलीबाहेर जायला सांगून तरुणीवर बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेकडून दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मांत्रिकाला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या