JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?

Belgaum Election Result: आज या निवडणुकीची मतमोजणी (Belgaum Election Result) होणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेळगाव, 06 सप्टेंबर: बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Belgaum Municipal Corporation Election) 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं. आज या निवडणुकीची मतमोजणी (Belgaum Election Result) होणार आहे. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीनं (Maharashtra Ekikaran Samiti) त्यांना तगडं आव्हान दिलंय. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे आज होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. त्याची आज मतमोजणी होईल. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

तुम्ही पण आंदोलनं आणि निदर्शनं करा, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

संबंधित बातम्या

महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप 55, काँग्रेस 45 जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच मोठं आव्हान असेल. आजच्या मतमोजणीसाठी केंद्रात 500 पोलीस तैनात करण्यात आलेत. तर मतमोजणी केंद्राच्या आवारात कलम 144 जारी केला आहे. तर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी 1500 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. तसंच प्रशासनानं मतमोजणी केंद्राच्या दिशेनं जाणारे सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या