JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed : ‘महाकार्गो’ व्यापारी, शेतकऱ्यांसाठी फायद्याची, पाहा कशी मिळते सुविधा

Beed : ‘महाकार्गो’ व्यापारी, शेतकऱ्यांसाठी फायद्याची, पाहा कशी मिळते सुविधा

लॉकडाउनच्या काळात समोर आलेली ही संकल्पना आता देखील सुरू असून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 06 डिसेंबर : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य घेऊन धावणारी एसटी प्रवाशांबरोबर शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांचा मालास घरातील सामान शिफ्टींगसाठी देखी धावत आहे. एसटी महामंडळाने महाकार्गो मालवाहतूक गाड्या तयार केल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात समोर आलेली ही संकल्पना आता देखील सुरू असून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी ही नेहमीच सज्ज असते. एसटी महामंडळ अंतर्गत कोरोना काळात माल वाहतूक करण्यासाठी महागकार्गो सेवा सुरू केली. यामुळे तोट्यात असणाऱ्या परिवहन  महामंडळाला आर्थिक नफा चांगला होत आहे. जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये छोटे मोठे व्यापारी व्यापार करतात. मात्र, खाजगी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून अधिक भाडे वसुली, हवी तेवढी सुरक्षितता नसल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश व्यापारी कार्गोचा लाभ घेत आहेत. यातून मागील 11 महिन्यांमध्ये बीड जिल्हा आगाराला 70 लाख रुपयाचा नफा मिळाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागात आठ आगार आहेत. त्या आगारातून रापमाच्या 29 ट्रकच्या माध्यमातून मालवाहतूक केली जाते. जनरल स्टोअर्स, ऑटोमोबाईल्स, हार्डवेअर, औषधी, तसेच खत शेती माल, अशा अनेक वाहतुकीसाठी महाकार्गोचा उपयोग होत आहे. Traffic rules: गाडी चालवण्यापूर्वी ‘हे’ नियम माहिती हवे, अन्यथा होईल मोठी शिक्षा महाकार्गो सेवेचे वैशिष्ट्ये तात्काळ सुविधा, सुरक्षित वाहतूक, महाराष्ट्रात कोठेही सेवा, अत्यंत माफक दरात, वेळेवर वितरण, आणि 24 तास सेवा. एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकात माल वाहतुकीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यापाऱ्याने ट्रान्सपोर्ट करण्यासाठीचा फॉर्म भरायचा असतो. त्यानंतरची पुढील सर्व प्रोसेस याच ठिकाणी घेतली केली जाते.   मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील 3 दिवसांच्या वाहतूकीमधील बदल माल वाहतुकीचे दर   200 किलोमीटरपर्यंत 57 रुपये प्रति किलोमीटर तर 201 किलोमीटरच्या पुढे 55 रुपये प्रति किलोमीटर दर आहेत. एकाच व्यापाऱ्याचे परतीचे भाडे मिळत असेल तर 200 किलोमीटरपर्यंत 56 रुपये व त्यापुढे 54 रुपये प्रति किलोमीटर भाडे आकारले जाते. महाकार्गोची सुविधा चांगली कोरोना कालावधीपासून प्रवास तर बंद होता काही प्रमाणात व्यापार सुरू होता. प्रायव्हेट ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून अधिक प्रमाणात भाडे वसुली जायचे. त्यात खासगी वाहतुकीतून माल चोरी होण्याची शक्यता असते आणि हवे तेवढी सुरक्षितता देखील मिळत नाही. महाकार्गोची सुविधा चांगली असल्याचे व्यापारी श्रीकिशन कीवनसरा यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी, शेतकरी बांधवांनी महाकार्गो सुविधेचा लाभ घ्यावा. ही शासकीय सेवा असून अल्प दरामध्ये मालाची वाहतूक केली जाते. वाहतूक सुरक्षित देखील असल्याचे हिम्मतकुमार मोरे विभागीय नियंत्रक यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या